Pakistan Inflation Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Inflation: भारताशी पंगा घेणं पाकड्यांना पडलं महागात; कर्जबाजारी पाकिस्तानात उडाला महागाईचा भडका

Pakistan Protest Inflation: दोन्ही देशातील तणातणीमुळे पाकिस्तानातील (Pakistan) महागाई नियंत्रणाबाहेर गेली आहे. 10 मे पासून किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये पीठ, डाळी, साखर आणि तेल महाग झाले आहे.

Manish Jadhav

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने 6-7 मे च्या रात्री पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल, पाकिस्ताननेही क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि लढाऊ विमानांनी अनेक भारतीय लष्करी तळांसह डझनभर शहरांवर हल्ला करुन महत्त्वाचे तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने त्यांची सर्व शस्त्रे हवेतच नष्ट केली. यानंतर भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या 11 लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. यामुळे पाकिस्तानचे 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्तीचे नुकसान झाले. त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेल्या पाकिस्तानात पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला.

दरम्यान, दोन्ही देशातील तणातणीमुळे पाकिस्तानातील (Pakistan) महागाई नियंत्रणाबाहेर गेली. 10 मे पासून किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने पाकिस्तानात पीठ, डाळी, साखर आणि तेल महाग झाले. सध्या पाकिस्तानात दूध 150 रुपये प्रति लिटर, पीठ 120 रुपये प्रति किलो, मोहरीचे तेल 500 रुपये प्रति लिटर आणि तूप 2,800 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे. अनेक ठिकाणी पाकिस्तानातील लोक रस्त्यावर उतरुन महागाईविरुद्ध निदर्शने करत आहेत.

महागाईने सामान्य जनता त्रस्त

एकीकडे पाकिस्तानातील सामान्य जनता महागाईने (Inflation) त्रस्त असताना, दुसरीकडे, भारताकडून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर फील्ड मार्शल ही पदवी मिळाल्याचा आनंद साजरा करत आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानातील लोक उपासमारीने त्रस्त आहेत. अन्नपदार्थांच्या किमती गगनाला भिडत आहेत. महागाई वाढत असताना लोक पीठ, साखर, डाळी आणि तांदूळ खरेदी करण्यासाठी पाकिस्तानच्या बाजारपेठेत गर्दी करत आहेत.

पाकिस्तानमधील अनेक दुकानांमध्ये पीठ, डाळी आणि साखर यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा संपला आहे. गेल्या काही दिवसांपासून झेलममधील दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा साठा संपला आहे. तूप, साखर आणि स्वयंपाकाचे तेल उपलब्ध नसल्याने लोकांना अडचणी येत आहेत.

महागाईमुळे ग्राहक आणि दुकानदारांमध्ये संघर्ष सुरु

पाकिस्तानमध्ये वाढत्या महागाईमुळे वाढत्या किमतींवरुन दुकानदार आणि खरेदीदारांमध्ये संघर्ष झाल्याच्या बातम्या येत आहेत. अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत. पाकिस्तानमध्ये 5 किलोच्या पिठाच्या पॅकेटची किंमत 560 रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. तिथेच चांगल्या दर्जाच्या तांदळाची किंमत सरासरी 275 पाकिस्तानी रुपये प्रति किलो आहे. त्याचप्रमाणे, मिलमध्ये 1 किलो बेसन डाळ 380 रुपयांना आणि 1 किलो बेसनासाठी 195 रुपये मोजावे लागत आहेत.

सफरचंद 500 रुपये प्रति किलो

पाकिस्तानमध्ये केवळ पीठ, डाळी, साखर आणि तूप महाग झाले नाही तर येथे एक किलो सफरचंदाची किंमत 500 रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. एका अंड्याची किंमत 30 रुपये आहे. जर तुम्ही एकाच वेळी सहा अंड्यांचे पॅकेट खरेदी केले तर तुम्हाला 145 रुपये द्यावे लागतील. पाकिस्तानी लोकांना वीजही उपलब्ध नाही. तसेच, पाण्याचीही मोठी टंचाई आहे. फळे आणि भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानमध्ये लोक उपासमारीने मरत आहेत. खाण्यासाठी पीठ नाही आणि चहा बनवण्यासाठी साखर नाही... पण मुनीर आणि शाहबाज ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या हातून झालेला मोठा आघात लपवण्यात व्यस्त आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT