Laos 
ग्लोबल

Laos: लाओसमधील खाजगी कंपनीत ओडिशातील कामगार ओलीस; व्हिडिओद्वारे सरकारकडे केली मोठी मागणी

ना पगार मिळतोय ना येथून बाहेर सोडले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Pramod Yadav

Laos: लाओसमधील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या ओडिशातील काही कामगारांना ओलीस ठेवल्याचा आरोप त्यांनी व्यवस्थापनावर केला आहे. भारत सरकारने त्यांना मुक्त करावे असे आवाहन कामगारांनी केले आहे. ना पगार मिळतोय ना येथून बाहेर सोडले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आग्नेय आशियाई देश लाओसमधील प्लायवूड कंपनीत काम करणाऱ्या 35 कामगारांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या समस्या समजावून सांगितल्या आहेत. कामगारांनी हा व्हिडिओ त्यांच्या गावातील लोकांना पाठवला आहे. ते काम करत असलेल्या कंपनीने त्यांना ओलीस ठेवल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

कामगारांनी त्यांना मुक्त करून घरी पाठवले जावे अशी विनंती व्हिडिओद्वारे सरकारला केली आहे. ज्या प्लायवूड कंपनीसाठी कामगार काम करत होते ती दीड महिन्यांपासून बंद आहे, पण त्यानंतरही त्यांना सोडले जात नाही आणि पगारही दिला जात नाही.

केंद्रपारा जिल्ह्यातील राजकनिका ब्लॉकमधील हे कामगार आहेत, कंपनीने त्यांचे पासपोर्टही काढून घेतल्याचा आरोप, कामगारांनी केला आहे. ही बाब राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिल्यावर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांना परत आणण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्याच्या कामगार आयुक्तांनी हा मुद्दा लाओसमधील भारतीय दूतावासाकडे मांडला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाऱ्याने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT