Now lethal infection can be spread by rats and monkeys Dainik Gomantak
ग्लोबल

उंदीर आणि माकडांमुळे होऊ शकतो प्राणघातक संसर्ग, तज्ज्ञांनी दिला इशारा

तज्ज्ञांनी या जीवघेण्या विषाणूच्या प्रसाराबाबत असा इशारा दिला आहे, की ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

दैनिक गोमन्तक

गेल्या दोन वर्षांत कोरोना विषाणूने संपूर्ण जगाची दिशा आणि स्थिती बदलून टाकली आहे. मात्र, हळूहळू कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला आहे आणि कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही स्थिर झाली आहे. पण दरम्यान, तज्ज्ञांनी या जीवघेण्या विषाणूच्या प्रसाराबाबत असा इशारा दिला आहे, की ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

प्रिन्स्टन विद्यापीठाचे (University) संशोधक आण्विक जीवशास्त्रज्ञ (Molecular Biologist) सीन किंग (Sean King) आणि संगणक शास्त्रज्ञ मोना सिंग (Mona Singh) यांनी विविध सस्तन प्राण्यांच्या प्रजातींचा अभ्यास केला, विशेषत: ते जीव जे सहजपणे SARS सारखे विषाणू पसरवू शकतात. त्यांच्या अभ्यासात, त्यांना असे आढळून आले की उंदरांच्या काही प्रजाती ज्या वारंवार SARS विषाणूच्या संपर्कात येतात त्यांच्या शरीरात विशिष्ट स्तरावर विषाणू प्रतिरोधक क्षमता विकसित होण्याची अधिक शक्यता असते.

पीएलओएस कम्प्युटेशनल बायोलॉजी (PLOS Computational Biology) जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे म्हटले आहे की, उंदरांना वारंवार सार्स विषाणूचा जनुकीय संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. वारंवार होणाऱ्या संसर्गामुळे उंदरांच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण झाली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. प्रोफेसर मोना सिंग आणि डॉ. किंग यांनी संशोधनात सांगितले की त्यांनी ACE2 रिसेप्टर्सचा अभ्यास केला आहे. SARS सारखे विषाणू यामध्ये सस्तन प्राण्यांच्या पेशींमध्ये प्रवेश करतात. ते म्हणाले की, टीमला अभ्यासादरम्यान असे आढळून आले की मानवी शरीरात किंवा इतर सस्तन प्राण्यांमध्ये, ज्यांना SARS ची लागण झालेले जीव मानले जात नाही. त्यात ACE 2 रिसेप्टर्स असल्याचा फारसा पुरावा नाही. दोन्हीच्या जीनोमिक विश्लेषणाने उंदरांमध्ये ACE2 ची जलद उत्क्रांती दर्शविली.

ब्राझीलच्या संशोधकांनी खुलासा केला आहे

त्याच वेळी, ब्राझीलच्या संशोधकांनी त्यांच्या एका अभ्यासात भीती व्यक्त केली आहे की अॅमेझॉनच्या जंगलात असलेल्या बॅक्टेरिया आणि विषाणूंद्वारे देखील एक धोकादायक महामारी पसरू शकते. ते विषाणू आणि जीवाणू उंदीर आणि माकडांच्या माध्यमातून मानवी शरीरात सहज पोहोचू शकतात. त्यांनी सांगितले की, अलीकडेच विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ मार्सेलो गोर्डो आणि त्यांच्या टीमला कूलरमध्ये तीन पाईड टमरिन माकडांचे कुजलेले मृतदेह सापडले. ते म्हणाले की, या कुलरचा वीजपुरवठा कोणीतरी खूप पूर्वी बंद केला होता, त्यामुळे माकडांचे मृतदेह आत कुजले होते. मार्सेलो आणि त्यांच्या टीमने माकडांचे नमुने घेतले. माकडांच्या नमुन्यांमधून परजीवी जंत, विषाणू आणि इतर संसर्गजन्य घटक शोधले. त्यांनी सांगितले की, माकड आणि उंदरांना मानवी शरीरापासून दूर ठेवल्यास अनेक प्राणघातक संसर्गापासून बचाव होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! देवासमोर ठेवण्यासाठी मागितले दागिने, भामट्याने केली लंपास सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

Goa Tourism: यंदाचा पर्यटन हंगाम जोरात! रशियाहून आठवड्याला 9 विमाने गोव्यात येणार; कझाकिस्तानहूनही सुरु होणार चार्टर सेवा

SCROLL FOR NEXT