Taliban Education Minister Dainik Gomantak
ग्लोबल

Taliban: 'त्याने किती बॉम्ब फेकले...,' मुलींच्या शिक्षणावर बंदी घालणाऱ्या मंत्र्यांने तोडले अकलेचे तारे

Taliban Education Minister: तालिबानने मुलींना उच्च शिक्षण घेण्यास बंदी घातली आहे. याविरोधात देशात अनेक ठिकाणी निदर्शनेही झाली आहेत.

दैनिक गोमन्तक

Taliban Education Minister: तालिबानने मुलींना उच्च शिक्षण घेण्यास बंदी घातली आहे. याविरोधात देशात अनेक ठिकाणी निदर्शनेही झाली आहेत. यातच आता, तालिबान सरकारमधील शिक्षण मंत्री निदा मोहम्मद नदीमने एका अफगाण टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुलींचे शिक्षण इस्लाम आणि अफगाण मूल्यांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.

नुकत्याच, झालेल्या एका बैठकीत ते म्हणाले की, 'तालिबानी सैनिकाची योग्यता तो किती शिक्षित आहे, यावरुन जोखता येत नाही तर त्याने किती बॉम्ब फेकले यावरुन जोखली पाहिजे.'

तालिबान 20 वर्षे मागे पडला

तालिबानच्या या निर्णयामुळे अफगाणिस्तान (Afghanistan) जवळपास 20 वर्षे मागे पडला आहे. तालिबानच्या या निर्णयाचा जगभरातून निषेध होत आहे. मुस्लिम देशही या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र, तालिबान (Taliban) हा निर्णय मागे घेणार नसल्याचे शिक्षणमंत्री निदा मोहम्मद नदीम यांनी स्पष्ट केले आहे. ते पुढे म्हणाले की, 'तुम्ही अणुबॉम्ब टाकला तरी तालिबान या निर्णयाची अंमलबजावणी करेल.'

कोण आहे निदा मोहम्मद नदीम

निदा हा तालिबानच्या सैन्याचा कमांडरही राहिला आहे. त्याचे फारसे शिक्षण झालेले नाही. 2001 मध्ये अमेरिकेने तालिबानला सत्तेतून बाहेर काढले आणि शिक्षण धोरणात सुधारणा केली तेव्हा नदीमने कडाडून विरोध केला होता. यानंतर त्याने अनेक मदरसे सुरु केले. त्यानंतर तो तालिबानमध्ये सामील झाला होता. नदीम हा तालिबानचा सर्वोच्च नेता हैबतुल्ला अखुंदजादाचा खास मानला जातो. गेल्या वर्षी तालिबान सत्तेत परतल्यावर नदीमला नांगरहार प्रदेशाचा गव्हर्नर बनवण्यात आले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नांगरहार प्रांताचा गव्हर्नर बनल्यानंतर नदीमने तालिबानी सैनिकांना लोकांना मारण्याचे आदेशही दिले होते. तालिबानचा विरोध करणाऱ्यांना ठार मारण्याचा नदीमचा आदेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT