imran khan Dainik Gomantak
ग्लोबल

1-2 नव्हे... 9 जागांवर इम्रान खान लढवणार निवडणूक, उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ प्रमुख आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी नॅशनल असेंब्लीच्या रिक्त झालेल्या सर्व 9 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तान (Pakistan) तहरीक-ए-इन्साफ प्रमुख आणि माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी नॅशनल असेंब्लीच्या रिक्त झालेल्या सर्व 9 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच लाहोर उच्च न्यायालयाने याविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. इम्रान खान यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शाहिद जमील खान यांनी सुनावणी केली आहे. (Not 1 or 2 Imran Khan will contest election on 9 seats High Court rejected the petition)

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती खान यांनी विचारले की, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या (ECP) कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले आहे का, ज्याबद्दल याचिकाकर्त्याने चिंता व्यक्त केली आणि तसे न झाल्यास याचिकाकर्त्याला आता प्रतीक्षा करावी लागणार आहे. उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतरच तक्रार वैध ठरेल आणि त्यानंतर तुम्ही निवडणूक आयोग आणि नंतर कोर्टात जाऊ शकता.

याचिकाकर्त्याने 'राष्ट्रीय हिताचा' दिला हवाला

न्यायालयाच्या निरीक्षणानंतर याचिकाकर्त्याच्या वकिलाने आपली याचिका मागे घेतली आहे. यासह न्यायमूर्ती खान यांनी याचिका फेटाळून लावली आहे. इम्रान खान यांना सर्व नऊ जागांवर होणारी पोटनिवडणूक लढवण्यापासून रोखण्यात यावे, अशी विनंती याचिकाकर्त्याने न्यायालयाकडे केल्याची माहिती समोर येत आहे. त्यासाठी 'राष्ट्रहिताचा' हवाला देण्यात आला आहे.

25 सप्टेंबर रोजी होणार पोटनिवडणूक

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात जाहीर केले की नॅशनल असेंब्लीच्या (NA) जागांसाठी 25 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. खरं तर, पक्षप्रमुखांना हटवल्यानंतर PTI MNA ने दिलेल्या 131 राजीनाम्यांपैकी 11 आयोगाने हे स्वीकारले होते मात्र या निर्णयानंतर लगेचच इम्रान खान यांनी जागांवर उमेदवारी जाहीर केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: 'नोबेल मिळाला नाही, आता मी शांततेचा विचार करणार नाही'; ट्रम्प यांचं नॉर्वेला खळबळजनक पत्र, ग्रीनलँडवर ठोकला दावा!

Bicholim Mining Protest: पैरातील लोकांचा खाणीविरोधात पुन्हा एल्गार! साळगावकर खाणीचे कामकाज पाडले बंद; प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक

Pakistani Actress Video: "भारतीय पुरुष पाकिस्तानी मुलींसाठी वेडे...", पाक अभिनेत्रीच्या दाव्याने सोशल मीडियावर वाद, व्हिडिओ VIRAL

Viral Post: "आता तरी गंभीर व्हा!" विजयाचा पत्ता नाही अन् पराभवांचे रेकॉर्ड्स; नेटकऱ्यांनी गौतम गंभीरला धरलं धारेवर

Goa Crime: मांद्रेत धक्कादायक प्रकार, 6 जणांच्या टोळक्याकडून वृद्ध पती-पत्नीसह मुलाला मारहाण; प्रॉपर्टीच्या वादातून राडा!

SCROLL FOR NEXT