Missile testing  Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकेच्या चिथावणी नंतरही उत्तर कोरियाने केली क्षेपणास्त्राची चाचणी

जपानच्या क्योडो वृत्तसंस्थेने उत्तर कोरियाने एकापाठोपाठ आठ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन आपल्या कृत्यांमुळे कायम चर्चेत असतो. अमेरिका आणि शेजारी देश दक्षिण कोरियाच्या इशाऱ्यांनंतरही किम क्षेपणास्त्र चाचण्या करत आहे. उत्तर कोरियाने रविवारी सकाळी अज्ञात बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचे वृत्त समोर येत आहे . क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची माहिती दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफकडून आली आहे. (North Korea tests missile despite US warning)

त्याचवेळी, जपानच्या क्योडो वृत्तसंस्थेने उत्तर कोरियाने एकापाठोपाठ आठ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याचे म्हटले आहे. एका सरकारी सूत्राच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला आहे. यापूर्वीही उत्तर कोरियाने क्षेपणास्त्राच्या चाचण्या केल्या आहेत.

उत्तर कोरियाने अशा वेळी ही क्षेपणास्त्र चाचणी केली आहे, जेव्हा त्याचा अमेरिका आणि दक्षिण कोरियाशी वाद वाढत चालला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक दिवस आधी म्हणजे शुक्रवारीच अमेरिकेचे प्रतिनिधी सुंग किम दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे पोहोचले. अशा स्थितीत अलीकडच्या घडामोडींमुळे हा तणाव आणखी वाढू शकतो.

अमेरिकेने नुकतीच उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणी कार्यक्रमावर कारवाई करत उत्तर कोरियाची कंपनी आणि एका व्यक्तीवर निर्बंध लादले आहेत. उत्तर कोरियाच्या अणुचाचणीला पाठिंबा दिल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. यानंतर अमेरिकेने उत्तर कोरियाला इशारा दिला होता की, किम जोंग उन आपल्या कृत्यांपासून परावृत्त झाले नाही तर अशा प्रकारचे निर्बंध लादले जाऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026: कॅप्टन रजत पाटीदारचा मास्टरस्ट्रोक; आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जिंकले आयपीएलचे जेतेपद!

Goa Comunidade land: जमीन घोटाळा प्रकरणी सावंत गावकर आक्रमक; सर्वण कोमुनिदादची जमीन, गावकऱ्यांनी अखेर उभारला फलक

Domestic Violence Case: 4 तास अघोरी छळ आणि जीवघेणा ड्रामा! हिस्ट्रीशीटरचा बायकोवर अमानुष अत्याचार; 25 वर्षीय नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mapusa Municipality: म्हापशातील नोकरभरतीत नियमांचे उल्लंघन! पालिकेतील पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह, 11 कर्मचाऱ्यांची बढती वादाच्या भोऱ्यात

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT