North Korea Dainik Gomantak
ग्लोबल

North Korea: किम जोंग उनची सटकली; जपानमध्ये खळबळ...

उत्तर कोरियाने पुन्हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले आहे

Puja Bonkile

North Korea: उत्तर कोरियाने पुन्हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले आहे. देशाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने गुरुवारी याची पुष्टी केली. त्याचवेळी उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचे जपानच्या तटरक्षक दलाचे म्हणणे आहे. तसेच, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, कोरियन क्षेपणास्त्र जपानी भूभागावर पडले नाही.

  • जपान सरकारने दिली चेतावणी


होक्काइडोजवळ राहणाऱ्या लोकांना इमारती किंवा भूमिगत ठिकाणी आश्रय घेण्याचा इशारा दिला आहे. जपान सरकारने ताबडतोब जागा रिकामी करा असा प्राथमिक इशारा दिला.

याशिवाय हे क्षेपणास्त्र जपानच्या वेळेनुसार सकाळी 8:30च्या सुमारास पडल्याचेही इशाऱ्यात म्हटले आहे. याबाबत अधिक माहिती देताना जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा म्हणाले की, उत्तर कोरियाकडून डागलेले क्षेपणास्त्र जपानच्या हद्दीत पडले नाही. उत्तर कोरियाकडून डागण्यात आलेले क्षेपणास्त्र हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र (ICBM) क्षेपणास्त्र असावे, असे जपानच्या संरक्षणमंत्र्यांचे म्हणणे आहे.


क्षेपणास्त्र प्रक्षेपित केल्यानंतर सरकारने होक्काइडोच्या लोकांना आश्रय घेण्यास सांगितले असले तरी गेल्या वर्षीही हा आदेश जारी करण्यात आला होता . यानंतर सरकारने तपासानंतर आदेश मागे घेतला आणि क्षेपणास्त्र होक्काइडोजवळ पडण्याची शक्यता नसल्याचे सांगितले.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये उत्तर कोरियाकडून मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र डागल्यानंतर जपानने असाच आदेश जारी केला होता. त्या वेळी, जपानी अधिकाऱ्यांनी त्यांच्या ईशान्येकडील प्रदेशातील रहिवाशांना आश्रयस्थानांमध्ये राहण्याचे आदेश दिले. याशिवाय ट्रेन थांबवण्यात आली. प्रशांत महासागरात क्षेपणास्त्र पडण्यापूर्वी कोणतेही नुकसान झाले नव्हते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT