Nikki Haley Dainik Gomantak
ग्लोबल

USA: "पाकिस्तान, इराक अन्..." या देशांची मदत बंद करणार निक्की हेली

USA: अमेरिकन लोकांची मेहनत आपण अशा देशांना मदत करुन वाया घालवू नये असे त्यांनी म्हटले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

USA: अमेरिकेत 5 नोव्हेंबर 2024 मध्ये राष्ट्रपती निवडणूक आहे. निवडणूकीची तारीख दूर असली तरीही राष्ट्रपती निवडणूकीत उतललेले उमेदवार आत्तापासूनच प्रचार करत आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी मोठी तयारी सुरु आहे.

यावर्षी रिपब्लिकन पार्टीतून भारतीय वंशाच्या निक्की हेली या राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी उमेदवारी करत आहेत.

प्रचारादरम्यान ,जनतेशी संवाद साधताना अमेरिकाविरोधी देशांना धडा शिकवणार असल्याचे म्हटले आहे. जर मी सत्तेत आले तर पाकिस्तान, इराक आणि चीनसारख्या अमेरिकाविरोधी देशांना अमेरिकेकडून केली जाणारी सर्व मदत बंद केली जाईल असे निक्की हेली यांनी म्हटले आहे.

जे देश अमेरिका( USA )चा तिरस्कार करतात त्यांना मिळणारी मदत पूर्ण कमी केली जाईल असे म्हटले आहे. अमेरिकन लोकांची मेहनत आपण अशा देशांना मदत करुन वाया घालवू नये असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, याआधी निक्की हेली यांनी दक्षिण कैरोलिनाच्या गव्हर्नर म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्र परिषदेत अमेरिकेच्या राजदूत म्हणून काम केले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला निक्की हेली यांनी राष्ट्रपती निवडणूकीसाठी उमेदवारी घेणार असल्याचे जाहीर केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT