Military Leadership Dainik Gomantak
ग्लोबल

नायजरमध्ये सत्तापालट करणाऱ्या हुकूमशाहने फ्रान्ससमोर टेकले गुडघे, अजूनही दूतावास...

Diplomatic Crisis In Niger: नायजरमधील लोकशाहीवादी सरकार उलथवून लावत लष्करी नेतृत्वाने सत्ता आपल्या ताब्यात घेतली.

Manish Jadhav

Diplomatic Crisis In Niger: नायजरमधील लोकशाहीवादी सरकार उलथवून लावत लष्करी नेतृत्वाने सत्ता आपल्या ताब्यात घेतली. यातच आता, इकोवासच्या इशाऱ्यानंतर नायजरमध्ये सत्तापालट करणाऱ्या लष्करी जनरलने आता गुडघे टेकले आहेत.

48 तासांच्या अल्टिमेटमनंतरही ते फ्रेंच राजदूताला काही करु शकले नाहीत. फ्रान्सचे राजदूत सिल्वेन इट्टे यांना 48 तासांत देश सोडण्यास सांगितले होते. नायजरमधील सत्तापालटानंतर जर कोणता देश प्रामुख्याने विरोध करत असेल तर तो फ्रान्स आहे.

एकेकाळी नायजरवर राज्य करणारा फ्रान्स जंटाच्या विरोधात आवाज उठवत असून राष्ट्राध्यक्ष बजोम यांच्या सुटकेची मागणी करत आहे.

वास्तविक, 26 जुलै रोजी नायजरमध्ये (Niger) सत्तापालट झाला होता. लष्कराने राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बजोम यांची सत्तेवरुन हकालपट्टी करुन देशाची कमान स्वत:च्या हातात घेतली होती. अध्यक्ष बजोम यांना पदावरुन हटवल्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले.

यानंतर ECOWAS आणि आफ्रिकन युनियनने नायजरला लष्करी कारवाईचा इशारा दिला होता. परंतु लष्करावर त्याचा विशेष परिणाम झाला नाही.

अध्यक्ष बजोम यांना अद्याप सोडण्यात आलेले नाही. दरम्यान, नायजरच्या लष्कराने फ्रान्सच्या राजदूताला देश सोडण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.

आम्ही नायजरचे शत्रू नाही!

दुसरीकडे, फ्रान्सने त्यांचा आदेश धुडकावून लावला आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, नायजरच्या धमकीनंतर आमचे राजदूत तिथे आहेत. ते पुढे म्हणाले की, आम्ही नायजरचे शत्रू नाही.

राजधानी पॅरिसमध्ये फ्रान्सच्या (France) राजदूतांशी झालेल्या संवादात मॅक्रॉन म्हणाले की, आमचे धोरण क्लिअर आहे. दबाव असूनही नायजरमध्ये आमचे राजदूत कायम आहेत.

यातून राष्ट्राध्यक्ष बजोम यांचे धाडस, आमच्या मुत्सद्दी अधिकाऱ्यांची वचनबद्धता दिसून येते. सत्तापालट करणाऱ्यांपुढे कोणीही झुकता कामा नये.

सरकार पाडणाऱ्यांना अल्टिमेटम देण्याचा अधिकार नाही

ते पुढे म्हणाले की, नायजरच्या कायदेशीररित्या निवडून आलेल्या सरकारला राजदूताला अल्टिमेटम जारी करण्याचा अधिकार आहे. सरकार उलथवून टाकणाऱ्या लोकांना तसे अधिकार नाहीत. आमचे राजदूत तिथे आहेत. आम्ही आमच्या दूतावासाच्या सुरक्षेबाबत सतर्क आहोत. नायजरच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने फ्रेंच सरकारला पॉल नायजरच्या हिताच्या विरोधात असल्याचे सांगितले आहे.

सुमारे 1500 फ्रेंच सैनिक अजूनही नायजरमध्ये तैनात आहेत

अद्यापही सुमारे 1500 फ्रेंच सैनिक नायजरमध्ये तैनात आहेत, ज्यांनी नायजरच्या सैन्याला प्रशिक्षण दिले आहे. हे सैनिक इस्लामिक अतिरेक्यांविरुद्धच्या लढाईत मदत करतात. सत्तापालटानंतर अशा कारवायांना स्थगिती देण्यात आली आहे. नायजरला देण्यात येणारी आर्थिक मदतही बंद करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT