NYC Museums Dainik Gomantak
ग्लोबल

NYC Museums: अप्सरा पुन्हा मायदेशी येणार; न्यूयॉर्क म्युझियम भारताला परत करणार 15 प्राचीन मूर्ती

न्यूयॉर्कच्या सर्वोच्च न्यायालयाने 22 मार्च रोजी मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट (मेट) विरुद्ध शोध वॉरंट जारी केले.

Pramod Yadav

NYC Museums: न्यूयॉर्कच्या सर्वोच्च न्यायालयाने 15 प्राचीन मूर्ती भारताला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट मध्ये ही शिल्पे आहेत. न्यूयॉर्क सुप्रीम कोर्टाने संग्रहालयाविरुद्ध शोध वॉरंट जारी केले आहे. त्यानंतर संग्रहालयाने 15 शिल्पे भारताला परत करणार असल्याची घोषणा केलीय.

सर्च वॉरंटमध्ये सूचीबद्ध केलेल्या 15 शिल्पे ही मध्य प्रदेशातील 11व्या शतकातील सँडस्टोन सेलेस्टियल डान्सर (अप्सरा) आहे, ज्याची किंमत 1 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त आहे. या यादीत पश्चिम बंगालमधील इ.स.पू. पहिल्या शतकातील यक्षी टेराकोटांचाही समावेश आहे.

न्यूयॉर्कच्या सर्वोच्च न्यायालयाने 22 मार्च रोजी मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट विरुद्ध शोध वॉरंट जारी केले. मेनिनने न्यूयॉर्क पोलिस विभाग किंवा होमलँड सिक्युरिटी विभागाच्या कोणत्याही एजंटला पुरातन वास्तू जप्त करण्यासाठी आणि "विलंब न करता त्यांना न्यायालयासमोर आणण्यासाठी 10 दिवस दिले आहेत".

मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट (Met) ने 30 मार्च रोजी एक निवेदन जारी केले आहे. "शिल्प भारतातून बेकायदेशीरपणे आणण्यात आल्याचे समजल्यानंतर, ते भारत सरकारला परत केले जातील. या सर्व कला एकेकाळी सुभाष कपूर यांनी विकल्या होत्या, जे सध्या भारतातील तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. कुख्यात सुभाष कपूर 77 भारतीय पुरातन वस्तूंच्या तस्करीशी संबंधित आहे. तो सध्या तामिळनाडू येथील तुरुंगात आहे."

सर्च वॉरंटमध्ये सूचीबद्ध केलेल्या 15 भारतीय पुरातन वास्तूंची किंमत 1.201 दशलक्ष डॉलर (सुमारे 9.87 कोटी रुपये) एवढी आहे. या वस्तू चोरीला गेल्या आहेत आणि चोरीच्या मालमत्तेचा ताबा घेण्यासारख्या गुन्ह्यांचा पुरावा आहे. अमेरिकेच्या दंडनीय कायद्यानुसार हा गुन्हा आहे. असे शोध वॉरंटमध्ये नमूद केले आहे.

दरम्यान, सुभाष कपूरला 30 ऑक्टोबर 2011 रोजी फ्रँकफर्टमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर जुलै 2012 मध्ये त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले. 1 नोव्हेंबर 2022 रोजी, तामिळनाडूच्या कुंभकोणम येथील न्यायालयाने कांचीपुरममधील वरदराजा पेरुमल मंदिरात चोरी आणि मूर्तींची बेकायदेशीर निर्यात केल्याबद्दल कपूरला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. सध्या तो त्रिची तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'पूजा नाईकच्या आरोपांना पुरावा मिळेना', DGP आलोक कुमार यांचा खुलासा; प्रकरणाचा तपास थंडावणार?

अग्रलेख: गोव्यात गुन्हा करा, 'बिनधास्त पसार' व्हा! सुरक्षा यंत्रणांना जाग येण्यापूर्वीच गुन्हेगार गायब

Goa Politics: 'शांत राहा! आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात', मनोज परब यांचा दावा, कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन; Watch Video

DLF Housing Project: 'दाबोळी टेकडीवरील एकाही झाडाला हात लावू नका', कोर्टाची 'डीएलएफ'ला ताकीद

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेस 'झेडपी' निवडणुकीबाबत गंभीर आहे?

SCROLL FOR NEXT