NeoCov Dainik Gomantak
ग्लोबल

Omicronपेक्षाही धोकादायक NeoCoV,प्रत्येक तिसऱ्या रुग्णाला मारेल? जाणून घ्या नविन विषाणूचे सत्य!

निओकोव्ह हा विषाणूजन्य आजाराचा मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम शी जवळचा संबंध आहे. 2012 आणि 2015 मध्ये सौदी अरेबिया येथे पहिल्यांदा पटली ओळख .

दैनिक गोमन्तक

कोरोना ने संपूर्ण जग भयग्रस्त आहे. सध्या जगातिल कोरोना चा आकडा हा 3 कोटी च्या वर गेला आहे. डेल्टा, डेल्टा प्लस आणि ओमायक्रॉन या कोरोनाच्या प्रकाराने जगभरात धुमाकूळ घातला. ओमायक्रॉनमुळे आलेली लाट अजून ओसरत नाही अशातच कोरोनाचं नवा प्रकार वटवाघळांमध्ये सापडल्याने चिंता वाढली आहे. त्यातच आता चीनमधील वुहान (wuhan) येथील शास्त्रज्ञांनी निओकोव्ह या नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूची माहिती दिली. त्याच्या गांभीर्याचा अंदाज अनेकांना सतावत आहे. या प्रकारच्या कोरोना (Covid19) व्हायरसमागील सत्य काय आहे, चला जाणून घेऊया.

काय हा कोरोना व्हायरसचा वेगळा प्रकार आहे?

हा एक नवीन प्रकार आहे किंवा SARS-CoV-2 किंवा COVID-19 सारखा दुसरा प्रकारचा कोरोना विषाणू आहे. हा Omicron किंवा Delta सारखा नवीन प्रकार नाही. चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेस आणि वुहान युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे सुचवले आहे की, निओकोव्ह हा विषाणूजन्य आजाराचा मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) शी जवळचा संबंध आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव मध्य पूर्वीय देशांमध्ये 2012 आणि 2015 मध्ये सौदी अरेबिया (Saudi Arabia) येथे पहिल्यांदा याची ओळख पटली.

चिनी संशोधकांच्या मते, NeoCoV चा मृत्यूदर अधिक आहे. प्रत्येक तीन संक्रमित व्यक्तींपैकी एकाचा यामुळे मृत्यू होतो आणि त्याचा सध्याचा SARS-CoV-2 कोरोना विषाणूचा प्रसाराचा दर हा जास्त आहे. NeoCoV वर झालेल्या ब्रीफिंगनंतर, रशियन स्टेट व्हायरोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरच्या तज्ञांनी गुरुवारी एक निवेदन जारी केले, असे ही त्या अहवालात म्हटले आहे.

मानवांमध्ये सापडला का अंश?

हे फक्त दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) वटवाघळांमध्ये आढळून आला आहे, परंतु चिनी संशोधकांच्या अभ्यासानुसार, त्यात आणखी बदल झाल्यास भविष्यात याचा मानवाला धोका निर्माण होऊ शकतो. संशोधकांनी सांगितले की हेम्‍यूटेशन मानवांसाठी धोकादायक बनण्यापासून फक्त एक म्‍यूटेशन दूर आहे. चीनमधील वुहान विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सांगितले की निओकोव्ह, SARS-CoV-2 प्रमाणेच मानवी पेशींमध्ये प्रवेश करू शकतो. याची लागण झाल्यास याचा मृत्युदर हा उच्च असल्याचे मानले जाते. वुहानमधील शास्त्रज्ञांच्या मते, NeoCoV ची लागण झालेल्या तीनपैकी एक रुग्ण मरू शकतो.

WHO चे मत काय आहे ?

डब्ल्यूएचओने (Who) म्हटले आहे की, यासंदर्भातील मानवांवर होणारे परिणाम तपासण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे. "अभ्यासात आढळलेल्या विषाणूमुळे मानवांना धोका निर्माण होईल की नाही यासाठी पुढील अभ्यासाची आवश्यकता असेल," असे आरोग्य संस्थेने म्हटले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये उद्धृत केलेल्या या अभ्यासाचे अद्यापही समीक्षा केली नाही असेही म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT