KitKat Chocolate Theft Dainik Gomantak
ग्लोबल

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

KitKat Chocolate Theft Europe: जगभरातील तरुणाईचे लाडके चॉकलेट ब्रँड असलेल्या 'किटकॅट' च्या बाबतीत युरोपमध्ये एक अजब आणि मोठी चोरीची घटना समोर आली.

Manish Jadhav

KitKat Chocolate Theft Europe: जगभरातील तरुणाईचे लाडके चॉकलेट ब्रँड असलेल्या 'किटकॅट' च्या बाबतीत युरोपमध्ये एक अजब आणि मोठी चोरीची घटना समोर आली. नेस्ले कंपनीने स्वतः या घटनेची पुष्टी केली असून मध्य इटलीतील कारखान्यातून पोलंडला जात असताना चोरांनी तब्बल 12 टन किटकॅट चॉकलेट बार पळवले. ही चोरी अशा वेळी झाली जेव्हा संपूर्ण युरोपमध्ये 'ईस्टर' सणाची तयारी जोरात सुरु आहे. या सणादरम्यान चॉकलेट हंटसारख्या परंपरांमुळे चॉकलेटला मोठी मागणी असते, मात्र चोरांनी त्यापूर्वीच आपला 'हात' साफ केला.

नेस्ले कंपनीने आपल्या अधिकृत 'X' हँडलवरुन या चोरीची माहिती देताना सांगितले की, ''इटलीतील त्यांच्या प्रॉडक्शन फॅसिलिटीमधून ही चॉकलेटची खेप निघाली होती, जी संपूर्ण युरोपमध्ये वितरीत केली जाणार होती. तत्पूर्वी, 12 टन किटकॅट बार चोरीला गेले. आम्ही सध्या स्थानिक अधिकारी आणि सप्लाय चेन पार्टनर्सच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करत आहोत." विशेष म्हणजे, चोरी मोठी असली तरी ग्राहकांच्या सुरक्षेबाबत कोणतीही चिंता नाही आणि बाजारातील (Market) पुरवठ्यावर याचा कोणताही परिणाम होणार नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले.

या गंभीर घटनेवर नेस्लेच्या प्रवक्त्याने काहीसा मिश्किल सूर लावत प्रतिक्रिया दिली. चोरांच्या 'उत्कृष्ट चवीचे' (Great Taste) कौतुक करतानाच त्यांनी नमूद केले की, अशा प्रकारच्या आव्हानांचा सामना सध्या संपूर्ण इंडस्ट्रीला करावा लागत आहे. ईस्टरच्या काही दिवस आधी ही चोरी झाल्याने हे चॉकलेट आता कोणत्या 'ब्लॅक मार्केट' मध्ये जाणार, याबाबतही चर्चा रंगली आहे. 12 टन चॉकलेट म्हणजे साधारणपणे लाखो चॉकलेट बार चोरांच्या ताब्यात गेले.

दुसरीकडे, सोशल मीडियावर (Social Media) या चोरीवरुन मीम्सचा महापूर आला. "जेव्हा ट्रान्झिटमधील लोक 'ब्रेक' घेतात, तेव्हा असेच घडते," असे एका युजरने किटकॅटच्या प्रसिद्ध 'हॅव अ ब्रेक' (Have a break) या टॅगलाईनचा वापर करत टोमणा मारला. "आम्ही सोन्या-चांदीच्या चोऱ्या ऐकल्या होत्या, पण चॉकलेटची ही चोरी इंटरनेटवर धुमाकूळ घालतेय," असे अनेक नेटकऱ्यांनी म्हटले. पोलिसांनी तपासाला वेग दिला असून एवढ्या मोठ्या प्रमाणात चॉकलेटची वाहतूक करणारे ट्रक शोधणे हे आता त्यांच्यासमोर मोठे आव्हान ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT