Nestle Adds Sugar in Baby Foods: जगभरात बेबी फूड प्रोडक्ट बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. भारतात नेस्ले कंपनीच्या प्रोडक्टची विक्री खूप जास्त आहे. नेस्ले ही बेबी फूड प्रोडक्ट बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे, पण आता एक अहवाल समोर आला आहे, ज्याने तुम्हालाही धक्का बसेल. नेस्ले कंपनी यापूर्वी मॅगीबाबत वादात सापडली आहे. आता पुन्हा एकदा नेस्लेबाबत धक्कादायक बातमी समोर येत आहे. गरीब देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या बेबी फूड प्रोडक्टध्ये नेस्ले साखरेचा वापर करत असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.
नेस्ले भारतासह अनेक देशांमध्ये तसेच इतर आशियाई देश आणि आफ्रिकेत विकल्या जाणाऱ्या बेबी फूड प्रोडक्टध्ये साखरेचा वापर आहे. मात्र, युरोप आणि ब्रिटनमध्ये विकल्या जाणाऱ्या प्रोडक्टमध्ये साखरेचा वापर करत नाही.
स्विस तपास संस्था पब्लिक आय आणि आयबीएफएएन (International Baby Food Action Network) यांनी आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या बेबी फूड प्रोडक्टचे सॅम्पल घेतले तेव्हा हे उघड झाले. हे सॅम्पल टेस्टसाठी बेल्जियमच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. एक वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना खाद्यपदार्थ आणि सेरेलॅक दिले जाते. या सर्व सॅम्पलमध्ये सुक्रोज किंवा मधाच्या स्वरुपात साखर आढळून आली आहे.
भारतात, जिथे 2022 मध्ये सेल्स $250 दशलक्ष पेक्षा जास्त झाला आहे. दुसरीकडे, सर्व बेबी फूड प्रोडक्टमध्ये प्रत्येक सर्व्हिंगमध्ये सुमारे 3 ग्रॅम एक्स्ट्रा साखर असते. त्याचवेळी, आफ्रिका आणि दक्षिण आफ्रिकेत विकल्या जाणाऱ्या प्रोडक्टमध्ये प्रति सर्व्हिंग 4 ग्रॅम किंवा त्याहून अधिक साखर आढळली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.