Sher Bahadur Deuba Dainik Gomantak
ग्लोबल

Nepal Politics: PM देउबा पुन्हा सज्ज, काँग्रेस पक्षाच्या संसदीय नेतेपदी वर्णी

Nepal Politics: नेपाळचे पंतप्रधान आणि नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देउबा यांनी बुधवारी संसदीय पक्षाच्या नेतेपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला.

दैनिक गोमन्तक

Nepal Politics: नेपाळचे पंतप्रधान आणि नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देउबा यांनी बुधवारी संसदीय पक्षाच्या नेतेपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. देउबा यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी आणि पक्षाचे सरचिटणीस गगनकुमार थापा यांचा 39 मतांनी पराभव केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळी काँग्रेसच्या सर्व 89 खासदारांनी मतदानात भाग घेतला. यामध्ये 76 वर्षीय देउबा यांना 64 मते मिळाली, तर 45 वर्षीय थापा यांना केवळ 25 मते मिळाली. संसदीय पक्षाच्या नेत्याच्या निवडणुकीत विजयाचा अर्थ असा आहे की, 20 नोव्हेंबरच्या सार्वत्रिक निवडणुकीत नेपाळी काँग्रेस (Congress) सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्यानंतर देउबा पुढील सरकारचे नेतृत्व करतील.

काँग्रेसने प्रतिनिधीगृहात एकूण 89 जागा मिळवल्या.

नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत (Election) नेपाळी काँग्रेसने प्रतिनिधीगृहात एकूण 89 जागा मिळवल्या आहेत. यापैकी 57 जागा पक्षाने थेट मतदानाद्वारे तर 32 जागा समानुपातिक प्रतिनिधित्व निवडणूक पद्धतीद्वारे जिंकल्या आहेत.

दरम्यान, संसदीय सचिवालयातील सूत्रांनी सांगितले की, प्रतिनिधीगृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा 22 डिसेंबर रोजी होणार आहे. 275 सदस्यीय प्रतिनिधीगृहात 165 सदस्य प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडले गेले, तर उर्वरित 110 सदस्य समानुपातिक निवडणूक (Election) पद्धतीद्वारे निवडले गेले.

तसेच, हिमालयीन देशातील दीर्घकाळ चाललेली राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी प्रतिनिधीगृह आणि सात प्रांतीय विधानसभांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT