Nepal Helicopter Crash Dainik Gomantak
ग्लोबल

VIDEO: अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाणारं हेलिकॉप्टर शेतात कोसळलं, लँडिंगवेळी थरार; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

Nepal Helicopter Crash Video: नेपाळच्या दुर्गम डोंगराळ भागात पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघाताची थरारक घटना समोर आली.

Manish Jadhav

Nepal Helicopter Crash Video: नेपाळच्या दुर्गम डोंगराळ भागात पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघाताची थरारक घटना समोर आली. खोटांग जिल्ह्यातील खेतांग परिसरात लँडिंगच्या प्रयत्नात असताना एक हेलिकॉप्टर कोसळून अपघातग्रस्त झाले. हे हेलिकॉप्टर काठमांडू येथून एका व्यक्तीचा मृतदेह घेऊन अंत्यसंस्कारासाठी गावी येत होते. लँडिंगच्या वेळी वैमानिकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असला, तरी सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हेलिकॉप्टरमधील प्रवासी आणि परिसरात उपस्थित असलेले लोक पूर्णपणे सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या अपघाताचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तो पाहून कोणाच्याही अंगावर शहारे येतील.

जिल्हाधिकारी रेखा कंडेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर एका शेतात उतरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्याचवेळी तांत्रिक बिघाड किंवा भौगोलिक परिस्थितीमुळे हेलिकॉप्टरचे संतुलन बिघडले आणि ते जमिनीवर आदळले. नेपाळमधील (Nepal) डोंगराळ भागात रस्ते मार्गाची सोय नसल्यामुळे मृतदेह किंवा आजारी व्यक्तींना ने-आण करण्यासाठी हवाई मार्गाचा वापर करणे ही सामान्य बाब आहे. मात्र, या भागात योग्य धावपट्टीची कमतरता आणि कठीण भौगोलिक रचनेमुळे अशा प्रकारची उड्डाणे अत्यंत जोखमीची मानली जातात. आजच्या घटनेत हेलिकॉप्टरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, परंतु मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

नेपाळचा भूगोल हा हिमालयाच्या रांगांनी व्यापलेला असून येथील हवामान कधी बदलेल याचा नेमका अंदाज लावणे कठीण असते. आकडेवारीनुसार, नेपाळमध्ये होणाऱ्या बहुतांश हवाई दुर्घटनांमध्ये हेलिकॉप्टरचा (Helicopter) समावेश अधिक असतो. दुर्गम खेड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ही एकमेव जलद साधनसामग्री असली, तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे अनेक आव्हाने आहेत. सध्या नेपाळ प्रशासनाने घटनास्थळाचा ताबा घेतला असून तांत्रिक तपासणी सुरु केली आहे. हा अपघात वैमानिकाच्या चुकीमुळे झाला, की तांत्रिक बिघाड किंवा खराब हवामानामुळे याचा सखोल तपास केला जात आहे. या घटनेनंतर नेपाळमधील डोंगराळ भागातील हवाई वाहतुकीच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT