Nepal Flood Dainik Gomantak
ग्लोबल

Nepal Floods: नेपाळमध्ये जलप्रलयाचा हाहाकार! पूरबळींची संख्या 900 पार, 4200 हून अधिक जण अद्याप बेपत्ता; बचावासाठी 20 हजार सुरक्षा कर्मचारी मैदानात

Nepal Flood Missing People: नेपाळमधील जलप्रलयातील बळींचा आकडा सोमवारी ९३९ वर पोहोचला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

काठमांडू: नेपाळमधील जलप्रलयातील बळींचा आकडा सोमवारी ९३९ वर पोहोचला आहे. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण व व्यवस्थापन प्राधिकरणाने सोमवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ४,२४७ जण बेपत्ता असून, १०,४५१ जणांची सुटका करण्यात आली आहे.

पूरग्रस्त भागांत बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून, अंदाजे २० हजार सुरक्षा कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. बेपत्ता परदेशी नागरिकांची संख्या ५९२ आहे. दरम्यान, नेपाळच्या सैन्याने हवाई बचाव मोहिमेत २५२ परदेशी नागरिकांसह ३,३४४ नेपाळमधील नागरिकांची सुटका केली आहे. पूर आणि भूस्खलनाचा सर्वाधिक फटका चितवन जिल्ह्याला बसला असून, तेथे २७२ मृतदेह आढळले असून, काही ठिकाणी मृतदेहाचे फक्त अवशेष आढळले आहेत.

नवलपरासी (पूर्व) येथे २०७, नवलपरासी (पश्चिम) येथे १५१, नुवाकोटमध्ये ९५, गोरखामध्ये ६२, धादिंगमध्ये ५५, तनहुँमध्ये ३७ आणि रसुवामध्ये २४ जणांचा मृत्यू झाला आहे. बेपत्ता व्यक्तींमध्ये नेपाळ पोलिसांचे २५, नेपाळच्या सैन्याचे ४५ आणि सशस्त्र पोलिस दलाचे १३ कर्मचारी आहेत. याशिवाय सीमाशुल्क कार्यालयातील १५ आणि स्थलांतर विभागातील तीन कर्मचारी बेपत्ता आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT