Sher Bahadur Deuba Dainik Gomantak
ग्लोबल

चीन अन् अमेरिकेच्या मध्ये पिसून निघाला नेपाळ

चीनच्या दबावामुळे गेल्या पाच वर्षांपासून नेपाळ या कराराला अंतिम मान्यता देत नसल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमन्तक

चीन आणि अमेरिका यांच्यातील भांडणात नेपाळ चांगलाच अडकला आहे. मिलेनियम चॅलेंज कॉर्पोरेशनवर निर्णय घेण्यासाठी बिडेन सरकारने कालमर्यादा निश्चित केली आहे. जर नेपाळ या कराराला मान्यता देण्यात अपयशी ठरला तर तो मागे घेतला जाईल, असे अमेरिकेने (America) म्हटले आहे. एमसीसी करार होण्यापूर्वीच नेपाळची अर्थव्यवस्था ढासळली आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणारी अमेरिकन मदतही त्याला गमवावी लागू शकते. चीनच्या (China) दबावामुळे गेल्या पाच वर्षांपासून नेपाळ (Nepal) या कराराला अंतिम मान्यता देत नसल्याचे बोलले जात आहे. (US vs China Latest News In Marathi)

नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा मिलेनियम चॅलेंज कॉर्पोरेशनवर त्यांच्या युतीच्या भागीदारांमध्ये एकमत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना यात यश मिळत नाही. एमसीसी कराराबद्दल बोलायचे तर, 2017 मध्ये अमेरिका आणि नेपाळने त्यावर स्वाक्षरी केली होती. मात्र नेपाळच्या संसदेने त्याला अद्याप मंजुरी दिलेली नाही. तरतुदीनुसार, एमसीसी कराराची अंमलबजावणी करण्यासाठी नेपाळच्या संसदेची मंजुरी आवश्यक आहे.

अमेरिकेची मदत हाताबाहेर जाऊ शकते

आता अमेरिकेच्या एमसीसी मुख्यालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, करारात आणखी विलंब झाल्यास नेपाळला दिले जाणारे अमेरिकन अनुदान संपुष्टात येईल. नेपाळचे पंतप्रधान आणि त्यांचे सरकारी सहयोगी सीपीएन नेते पुष्प कमल दहल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अमेरिका नेपाळला संसदेत या कराराला पाठिंबा देण्यासाठी २८ फेब्रुवारीची मुदत देत आहे. MCC बोर्डाच्या संचालकांनी सांगितले की, 28 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्यास, MCC बोर्डाची बैठक 22 मार्च रोजी होणार असून पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल.

अमेरिकेने 500 दशलक्ष डॉलर्स देण्यास सांगितले

नेपाळने 28 फेब्रुवारीपर्यंत करार मान्य न केल्यास नेपाळला दिलेली कोट्यवधी डॉलर्सची मदत संपविण्याचा अधिकार बोर्डाला असेल. यासोबत एमसीसीने नेपाळसोबत केलेला करारही संपुष्टात येणार आहे. एमसीसी प्रकल्पांतर्गत अमेरिका नेपाळला आर्थिक मदत करणार आहे. अमेरिकेने 500 दशलक्ष देण्याचे मान्य केले होते, तर नेपाळने स्वतः 130 दशलक्ष गुंतवणूक केली असेल. याच्या मदतीने नेपाळ वीज ट्रान्समिशन लाइन आणि 300 किमी रस्ते अपग्रेड करणार होते. नेपाळमधील चिनी प्रभाव कमी करणे हा त्यामागचा उद्देश होता. त्यामुळेच चीन समर्थक नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली या कराराला सातत्याने विरोध करत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT