Nancy Pelosi Dainik Gomantak
ग्लोबल

'आम्ही लोकशाहीचे समर्थक...', Taiwan मध्ये दाखल होताच पेलोसींची पहिली प्रतिक्रीया

Nancy Pelosi: चीनच्या तीव्र विरोधानंतर अमेरिकेच्या सिनेटर नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये पोहोचल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Nancy Pelosi Taiwan Visit: चीनच्या तीव्र विरोधानंतर अमेरिकेच्या सिनेटर नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये पोहोचल्या आहेत. तैवानमध्ये दाखल होताच पेलोसी यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, 'आम्ही तैवानमधील लोकशाहीचे समर्थक आहोत. माझी तैवान भेट अमेरिकेच्या नियमांचे उल्लंघन करत नाही.'

दरम्यान, पेलोसी यांच्या आगमनानंतर तैवानमध्ये (Taiwan) लेव्हल टू अलर्ट जारी करण्यात आला आहे. चीनमध्ये नागरी संरक्षणाचे सायरन वाजत आहेत. पेलोसी यांच्या दौऱ्यावर चीनच्या (China) परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमेरिकेने दिलेली आश्वासने आणि विश्वास मोडला आहे.

दुसरीकडे, तैवानबाबत अमेरिका (America) चीनशी दोन हात करण्यास तयार असल्याचे सांगितले जात आहे. नॅन्सी पेलोसी यांचा तैवान दौरा अधिकृत असल्याचे अमेरिकेने सांगितले आहे. तर चीन अमेरिकन सिनेटरच्या तैवान दौऱ्याकडे स्वतःला आव्हान म्हणून पाहत आहे. प्रस्तावित दौऱ्याव्यतिरिक्त, नॅन्सी पेलोसी यांचे तैवानमध्ये आगमन झाले आहे.

तसेच, पेलोसी तैवानमध्ये आल्यानंतर काही वेळातच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. 'अमेरिकेने दिलेले आश्वासन मोडले आहे. त्यामुळे आता परिणामांना सामोरे जाण्याची अमेरिकेने तयारी ठेवावी. अमेरिका एक धोकादायक जुगार खेळत असल्याचे चीनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT