Muslim Woman Burnt Quran Dainik Gomantak
ग्लोबल

कुराण जाळल्याप्रकरणी मुस्लिम महिलेला कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Muslim Woman Burnt Quran: पाकिस्तानात एका मुस्लिम महिलेने काही दिवसांपूर्वी कुराणच्या प्रती जाळल्याने खळबळ उडाली होती.

Manish Jadhav

Muslim Woman Burnt Quran:

पाकिस्तानात एका मुस्लिम महिलेने काही दिवसांपूर्वी कुराणच्या प्रती जाळल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर पाकिस्तानात मोठ्याप्रमाणात असंतोष माजला होता. या महिलेला कुराणची काय अडचण होती, ज्याने तिला त्याच्या प्रती जाळायला भाग पाडले? या महिलेला कुराणच्या विरोधात होण्याचे कारण काय होते? असे अनेक सवाल उपस्थित झाले होते. याप्रकरणी आता पाकिस्तानी न्यायालयाने मुस्लिम महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. एका सरकारी वकिलांनी शुक्रवारी ही माहिती दिली. पाकिस्तानच्या ईशनिंदा कायद्यांतर्गत, कोणीही धर्म किंवा धार्मिक प्रतिकांचा अपमान केल्याबद्दल दोषी आढळल्यास त्याला मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते.

दरम्यान, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ईशनिंदेसाठी अद्याप फाशीची शिक्षा लागू केलेली नाही. सरकारी वकील मोहजीब अवेस यांनी सांगितले की, आसिया बीबीला 2021 मध्ये ईशनिंदेच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यावेळी काही व्यक्तींनी तिच्याविरुद्ध दावा केला होता की, तिने कुराणच्या प्रती जाळून त्याचा अपमान केला होता. त्यांनी सांगितले की, बीबीने न्यायालयात आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते.' मात्र तिला या प्रकरणात अपील करण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.

यापूर्वी ख्रिश्चन समाजातील एका महिलेलाही शिक्षा झाली होती

ख्रिश्चन समुदायातील आसिया बीबीला ईशनिंदा कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल तिला आठ वर्षांपूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु 2019 मध्ये तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. तिची सुटका झाल्यानंतर, इस्लामिक अतिरेक्यांच्या जीवे मारण्याच्या धमक्यांपासून वाचण्यासाठी ती कॅनडाला गेली.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार गटांचा असा विश्वास आहे की, ईशनिंदा आरोपांचा वापर अनेकदा धार्मिक अल्पसंख्याकांना धमकावण्यासाठी आणि वैयक्तिक सूड उगवण्यासाठी केला जातो. पंजाब प्रांतातील गुजरांवाला येथील आणखी एका न्यायालयाने मार्चमध्ये एका 22 वर्षीय विद्यार्थ्याला फाशीची शिक्षा सुनावली आणि दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये इस्लामचे प्रेषित मुहम्मद यांचा अपमान केल्याबद्दल दोषी आढळल्यानंतर एका किशोरवयीन मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: पंतप्रधानांचा सुरक्षा प्रभारी असल्याची तोतयागिरी केल्याप्रकरणी शिरंग जावळ विरोधात तक्रार दाखल

Antarctic Climate Change: अंटार्क्टिका किनारपट्टीतील हवामान बदलाचा होणार अभ्यास, गोव्यातून सात संशोधक घेणार सहभाग

Sadye: बहुमजली तसेच जलतरण प्रकल्पांना पाणीपुरवठा बंद करा! सडये ग्रामस्थांची मागणी; सामूहिक शेतीला देणार प्राधान्य

Poinguinim: गालजीबाग, तळपण नदीप्रदूषणावरुन कारवाईची मागणी! पैंगीण ग्रामसभेत मेगा प्रकल्पांना विरोध

Anmod Ghat: अनमोड घाटात वाहतूक ठप्प! संरक्षक कठड्याला धडकला ट्रक; रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT