Mohammed Nusairat @OliLondonTV
ग्लोबल

Video: ‘अमेरिका सडलेली लोकशाही, देशात शरिया कायदा आणला पाहिजे...’; मुस्लिम विद्यार्थ्याच्या वक्तव्यावरुन गदारोळ

American Democracy: शिकागो विद्यापीठात शिकणाऱ्या एका मुस्लिम विद्यार्थ्याने अमेरिकेबाबत अतिशय वादग्रस्त विधान केले आहे.

Manish Jadhav

American Democracy: शिकागो विद्यापीठात शिकणाऱ्या एका मुस्लिम विद्यार्थ्याने अमेरिकेबाबत अतिशय वादग्रस्त विधान केले आहे. त्याने अमेरिकेला इस्लामिक देश बनवण्याबाबत वक्तव्य केले. या विद्यार्थ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. शिकागो विद्यापीठात शिकणाऱ्या या विद्यार्थ्याचे नाव मोहम्मद नुसैरत असे आहे. व्हिडिओमध्ये नुसैरतने अमेरिकेला ‘कॅन्सर’ म्हटले. त्याचा हा व्हिडिओ 3 मे 2024 चा आहे, जो आता व्हायरल होत आहे.

नुसरैत व्हिडिओ म्हणताना दिसत आहे की, अमेरिका (America), अमेरिकन सरकार, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, भांडवलशाही, हे असे कॅन्सर आहेत, ज्याने अमेरिका आणि मध्यपूर्वेसह संपूर्ण जगभर आपल्या रोगाचा प्रसार केला. इथली लोकशाही सडलेली आहे. आम्हाला अमेरिकेत ‘शरिया कायदा’ हवा आहे. आपण आता इथेच राहू. आम्ही आमच्या देशात परत जाणार नाही. आम्ही अमेरिकेला ‘इस्लामिक देश’ बनवू.

मुस्लिम विद्यार्थ्याने इस्लामला ‘न्याय्य धर्म’ म्हटले

मोहम्मद नुसैरत पुढे म्हणाला की, ‘मुस्लिम (Muslim) आता या कॅन्सरला कंटाळले आहेत. ते अमेरिकन सरकारला कंटाळले आहेत. ते लोकशाहीला कंटाळले आहेत. त्यांना जीवन जगण्याचा नवा मार्ग हवा आहे. मुस्लिम या नात्याने आपण हे समजून घेतले पाहिजे की, आपल्याला जीवन जगण्याची एक नवीन पद्धत आहे. मुस्लिमांनाही दया नावाची गोष्ट आहे. देवाने ही गोष्ट प्रत्येकाला दिली आहे. गैरमुस्लिमांनी याचा विचार करण्याची गरज नाहीये.’ नुसरैतने पुढे असेही सांगितले की, इस्लाम हा ‘न्याय्य धर्म’ आहे, तो समाजात अमलात आणला पाहिजे.

विद्यापीठात डेटा सायन्सचा अभ्यास करणारा विद्यार्थी

नुसैरतच्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये असे म्हटले आहे की, तो शिकागो विद्यापीठात बॅचलर ऑफ सायन्स बीएस, डेटा सायन्सचा अभ्यास करत आहे. विद्यापीठाच्या मुस्लिम स्टुडंट्स असोसिएशनच्या (एमएसए) नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्याने अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला. यापूर्वीही, याच विद्यापीठातील एका मुस्लिम विद्यार्थ्याने असेच वक्तव्य केले होते. 26 एप्रिल 2024 रोजी UIC MSA मधील आपल्या भाषणात तो म्हणाला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT