Dawood Ibrahim Dainik Gomantak
ग्लोबल

Dawood Ibrahim: मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? कराचीतील रुग्णालयात दाखल

Dawood Ibrahim: दाऊदला दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Pramod Yadav

Dawood Ibrahim Hospitalised in Karachi: मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाकिस्तानमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाऊदवर कराचीमध्ये विषप्रयोग केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर विषप्रयोग केल्याचा दावा केला जात आहे. यामुळे दाऊदला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, दाऊद एका गंभीर आजारामुळे कराचीतील रुग्णालयात दाखल आहे, अशी पुष्टी दाऊदच्या टोळीतील एका माजी सदस्याने दिली आहे. दाऊदला दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रुग्णालयात कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आला आहे आणि त्याला ज्या मजल्यावर त्याच्यावर उपचार सुरु आहेत तेथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही. केवळ उच्चपदस्थ अधिकारी आणि कुटुंबातील जवळचे लोकच तेथे जाऊ शकतात.

दाऊदवरती विषप्रयोग केल्याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाह. मात्र, मुंबई पोलीस अधिकारी दाऊदच्या जवळच्या नातेवाईकांकडून (पुतण्या अलिशा पारकर आणि साजिद वागळे) याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, दाऊदला रुग्णालयात दाखल करण्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. पाकिस्तानी आणि भारतीय अधिकाऱ्यांनी याबाबतच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. दाऊदची तब्येत अचानक बिघडण्याचे एक कारण विष असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधीही दाऊदला अनेक गंभीर आजार झाल्याचा दावा करण्यात आला होता. अलिकडेच गँगरीनमुळे कराचीतील रुग्णालयात त्याच्या दोन बोटांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT