रशियात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरले आहे. ISIS ने मॉस्कोमध्ये दहशतवादी हल्ला केल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यात 133 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून त्यात लहान मुलांचाही समावेश आहे.
या दहशतवादी हल्ल्यानंतर रशियाने या हल्ल्यासाठी युक्रेनला जबाबदार धरले असून युक्रेनची मॉस्कोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला साथ असल्याचे म्हटले होते. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी जर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला कऱण्याचे सोडून जर रशियामध्ये लक्ष दिले असते तर हा हल्ला झाला नसता. रशियाच्या सैन्याने हा हल्ला होण्यापासून रोखायला हवे होते मात्र रशियाचे सैन्य युक्रेनवर हल्ला करण्यात व्यस्त असल्याने ते स्वत:च्या देशातील नागरिकांना वाचवू शकले नाहीत, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
दहशतवाद्यांनी इमारतीवर हल्ला केला असून त्यांनी एके-47 मधून गोळ्या झाडल्याचे दिसत आहे. लोकांनी सभागृहाबाहेर पडू नये म्हणून त्यांनी त्या इमारतीला आग लावली. आता दहशतवाद्यांनी गोळ्या घालल्यानंतर त्यांनी चाकूने लोकांच्या गळा कापल्याची माहिती समोर आली आहे.
मॉस्कोच्या बाहेरील क्रोकस सिटी हॉलमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. रशियावर 20 वर्षांतील हा सर्वात प्राणघातक हल्ला आहे. या हल्ल्यानंतर चार संशयित हल्लेखोरांसह अकरा जणांना अटक करण्यात आली. हत्याकांडानंतर काही तासांनंतर ISIS ने हा व्हिडिओ जारी केला. चार दहशतवादी हातात बंदुका आणि चाकू घेऊन मृतदेहाजवळून जात असल्याचे दिसत आहे. हॉलमध्ये घुसून एका दहशतवाद्याने पुन्हा एकदा मृत लोकांवर गोळ्या झाडल्या.
हा दहशतवादी हल्ला होताना जे लोक हजर होते त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार सशस्त्र दहशतवादी शांतपणे क्रोकस सिटी हॉलमधील मेटल डिटेक्टरजवळ आले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. फुटेजमध्ये रक्ताने माखलेले मृतदेह जमिनीवर पडलेले दिसत आहेत. त्यानंतर दहशतवाद्यांनी हॉल पेटवून दिला. अग्निशमन दल आणि आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी 133 मृतदेह बाहेर काढले. 100 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.