Maryam Nawaz And PM Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

'विक्षिप्त अन् मनोरुग्ण इम्रान खान खुर्चीसाठी देशाला ठेवतायेत ओलिस': मरियम नवाज

माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मुलीने इम्रान खान यांना विक्षिप्त आणि मनोरुग्ण असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

सत्ताधारी पीटीआयचे खासदार पाकिस्तानच्या (Pakistan) नॅशनल असेंब्लीमधील अविश्वास ठराव टाळण्यासाठी हाय व्होल्टेज ड्रामा करत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) आणि त्यांचे सहकारी परदेशी षड्यंत्राचा हवाला देत संसदेत चर्चेची मागणी करत आहेत. दरम्यान, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मुलीने इम्रान खान यांना विक्षिप्त आणि मनोरुग्ण असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयने पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of Pakistan) अविश्वास प्रस्तावाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली. (Miserable and mentally ill Imran Khan is keeping the country hostage for chair Maryam Nawaz)

अविश्वास प्रस्तावावरून नॅशनल असेंब्लीमध्ये झालेल्या गदारोळात मरियम नवाज यांनी शनिवारी इम्रान खान यांना मनोरुग्ण असल्याचे म्हटले आहे. ती म्हणाली, "ज्या व्यक्तीला आता संवेदनाच उरल्या नाहीत च्या व्यक्तीला संपूर्ण देशाला उद्ध्वस्त करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही आणि हा विनोद नाहीये. त्याला पंतप्रधान किंवा माजी पंतप्रधान मानू नका." एक मनोरुग्ण जो आपली खुर्ची वाचवण्यासाठी संपूर्ण देशाला ओलिस ठेवत आहे."

पाक विधानसभेच्या कामकाजाबद्दल बोलायचे झाले तर, सकाळी 10.30 वाजल्यापासून पीटीआयच्या खासदारांनी अविश्वास प्रस्तावावर मतदान न करण्याची मागणी करत गोंधळ घालायला सुरुवात केली. यादरम्यान विरोधी पक्षाचे खासदार आणि पीटीआयच्या खासदारांमध्ये जोरदार वादावादीही झाल्याचे समोर आले. या वेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी अविश्वास ठरावावर मतदानासाठी रात्री 8 वाजताची वेळ मागितली होती. भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता संसदेत मतदान पार पडणार आहे.

आज माझ्या सरकारचा शेवटचा दिवस!

संसदेच्या कामकाजादरम्यान इम्रान खानचे मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सभागृहाला संबोधित केले, ते त्यावेळी म्हणाले की, कदाचित आज माझ्या सरकारचा शेवटचा दिवस आहे, आणि त्यांचा आवाज संसदेत गुंजला- इन्शाअल्लाह.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT