Japan Airlines Fire Video Dainik Gomantak
ग्लोबल

Japan Airlines Fire Video: जपानमध्ये लँडिंग करताना दोन विमानांची टक्कर, प्लेनला भीषण आग; 379 प्रवासी थोडक्यात बचावले

Japan Airlines Fire Video: जपानमधील टोकियो हानेडा विमानतळाच्या धावपट्टीवर मंगळवारी दोन विमानांची टक्कर झाल्यानंतर एका विमानाला भीषण आग लागली.

Manish Jadhav

Japan Airlines Fire Video: जपानमधील टोकियो हानेडा विमानतळाच्या धावपट्टीवर मंगळवारी दोन विमानांची टक्कर झाल्यानंतर एका विमानाला भीषण आग लागली. विमानात 379 प्रवासी होते. जपानी वृत्तसंस्था एनएचकेने दिलेल्या माहितीनुसार, विमान लँडिंगनंतर दुसऱ्या विमानाला धडकल्याने आग लागल्याची घटना समोर आली आहे. अपघातानंतर विमानातील पाच जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले की, हानेडाने या घटनेनंतर सर्व रनवे बंद केले आहेत.

जपानी मीडियानुसार आग लागलेल्या फ्लाइटचा नंबर JAL 516 होता आणि या फ्लाइटने होक्काइडो येथून उड्डाण केले होते. हे विमान स्थानिक वेळेनुसार 16:00 वाजता न्यू चिटोस विमानतळावरुन निघाले आणि 17:40 वाजता हानेडा येथे उतरणार होते. NHK वरील लाईव्ह फुटेजमध्ये विमानाच्या खिडक्यांमधून ज्वाळा बाहेर येत असल्याचे दिसून आले. विमान कंपनीने सांगितले की, सर्व प्रवासी आणि क्रू यांना बाहेर काढण्यात आले आहे. जपानमध्ये अनेक दशकांपासून एकही गंभीर विमान अपघात झालेला नाही. देशातील सर्वात भीषण अपघात 1985 मध्ये झाला होता, जेव्हा टोकियो ते ओसाकाला जाणारे JAL जंबो जेट मध्य गुन्मा भागात क्रॅश झाले होते, ज्यामध्ये 520 प्रवासी आणि क्रू मारले गेले होते.

पाच सदस्य बेपत्ता

जेएएल 516 ला धडकलेल्या विमानातील पाच क्रू मेंबर्स बेपत्ता आहेत, वैमानिकाला सुखरुप बाहेर काढण्यात आल्याचे जपान तटरक्षक दलाने म्हटले आहे.

तटरक्षक दलाच्या विमानात सहा जण होते

जपान टाइम्सच्या वृत्तानुसार, तटरक्षक दलाने म्हटले आहे की, त्यांच्या एका विमानाची हानेडा विमानतळावर जपान एअरलाइन्सच्या विमानाशी टक्कर झाली. तटरक्षक दलाच्या विमानात एकूण 40 जण होते. यातील पाच जण घटनेनंतर बेपत्ता झाले, मात्र त्यांचा शोध लागला आहे.

नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात 72 जणांचा मृत्यू झाला होता

जानेवारी 2023 मध्ये नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात 72 लोकांचा मृत्यू झाला होता, त्यात पाच भारतीयांचा समावेश होता. मानवी चुकीमुळे ही घटना घडली होती. 15 जानेवारी 2023 रोजी लँडिंगच्या काही मिनिटांपूर्वी यती एअरलाइन्सचे विमान क्रॅश झाले. या विमानात एकूण 72 लोक होते, त्यापैकी पाच भारतीय होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खडकात अडकलेली क्रूझ बोट, वार्का पॅराग्लायडिंग प्रकरणाची पर्यटन मंत्र्यांकडून गंभीर दखल; मालकांना नोटीस

Goa Mining: गोवा सरकारचा मोठा निर्णय! माजी खाणपट्टाधारकांना खनिज विक्रीस परवानगी; ‘डंप पॉलिसी’अंतर्गत परवानगी

Lotulim Shipyard: ..आनीक 2 कामगारांक उपचारावेळार मरण, Video

Electricity Tariff Hike: ऐन दिवाळीत वीज दरवाढीचा शॉक! 1नोव्हेंबरपासून 20% कराचा भुर्दंड; विरोधकांकडून सरकारवर टीकास्त्र

Horoscope: या 5 राशी होणार मालामाल, गुंतवणुकीत फायदा; ‘रूचक राजयोग’ बदलणार आयुष्य

SCROLL FOR NEXT