A Massive Fire Breaks Out In A Night Club In Istanbul Dainik Gomantak
ग्लोबल

Turkey: इस्तंबूलमधील नाईट क्लबला भीषण आग, 29 जण जिवंत जाळले; 5 जणांना अटक

A Massive Fire Breaks Out In A Night Club In Istanbul: इस्तंबूलमधील नाईट क्लबला भीषण आग लागल्याचे वृत्त आहे.

Manish Jadhav

A Massive Fire Breaks Out In A Night Club In Istanbul: इस्तंबूलमधील नाईट क्लबला भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. यामध्ये 29 जणांचा मृत्यू झाला असून 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ही आग कुठल्यातरी कटाचा भाग म्हणून लावण्यात आल्याचे लोकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी अनेकांना अटकही करण्यात आली आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीयेच्या इस्तंबूलमध्ये एका नाईट क्लबमध्ये दिवसा आग लागली. त्यावेळी येथे दुरुस्तीचे काम सुरु होते. आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. इस्तंबूलच्या गव्हर्नर ऑफिसने सांगितले की, इतर आठ जण जखमी झाले आहेत. यातील सात जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या भीषण आगीशी संबंधित अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. हा क्लब शहराच्या युरोपियन भागाच्या बेसिकटास जिल्ह्यात येतो. या आगीत मृत्युमुखी पडलेले सर्वजण बांधकाम कामगार असल्याचे सांगण्यात येत आहे. 16 मजली इमारतीच्या तळमजल्यावर नाईट क्लब होता. तुर्कीयेचे न्यायमंत्री यिलमाझ तुन्च यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर ही माहिती दिली, ते म्हणाले की, पाच जणांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. यात नाईट क्लब व्यवस्थापनातील तीन आणि बांधकामाशी संबंधित एका व्यक्तीचाही समावेश आहे.

आतापर्यंत 5 जणांना अटक

माहिती देताना ते म्हणाले की, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरु करण्यात आली आहे. या तपासणीत तीन सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घटनास्थळी तपास सुरु असून पुरावे गोळा करण्यात येत आहेत. आगीचे कारण शोधण्यासाठी तीन तज्ज्ञांची टीम युद्धपातळीवर काम करत आहे. याप्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व पैलूंचा बारकाईने तपास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT