Hafiz Saeed And Masood Azhar Dainik Gomantak
ग्लोबल

Hafiz Saeed And Masood Azhar: हाफिज सईदला लाहोरमधून रावळपिंडीला, तर मसूद अजहरला सिंधमध्ये केलं शिफ्ट; पाकड्यांना 'ऑपरेशन सिंदूर'ची धास्ती

Masood Azhar And Hafiz Saeed Shifted To Safe Houses: जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर आणि लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद या दोन्ही मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांबाबत अत्यंत महत्त्वाची गुप्तचर माहिती समोर आली.

Manish Jadhav

Masood Azhar And Hafiz Saeed Shifted To Safe Houses: जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर आणि लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद या दोन्ही मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांबाबत अत्यंत महत्त्वाची गुप्तचर माहिती समोर आली असून, भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या दहशतीमुळे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय'ने या दोघांना अत्यंत सुरक्षित अशा 'सेफ हाऊस'मध्ये हलवले. भारतीय लष्कराकडून होणारे संभाव्य हवाई हल्ले किंवा अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून होणाऱ्या हत्येच्या भीतीने या दोन्ही दहशतवाद्यांची झोप उडवली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करचा म्होरक्या हाफिज सईद (Hafiz Saeed) याला लाहोरच्या जोहर टाउन परिसरातून थेट रावळपिंडी येथील गॅरिसन ग्राउंड परिसरात हलवण्यात आले असून, या ठिकाणाच्या अगदी जवळच पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय आहे. दुसरीकडे, मसूद अजहरला सिंध प्रांतातील नवाबशाह येथील एका गुप्त सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले असून, या दोघांचीही सुरक्षा व्यवस्था कमालीची कडक करण्यात आली. त्यांना कोणालाही प्रत्यक्ष न भेटण्याचे आणि हालचाली मर्यादित ठेवण्याचे सक्त निर्देश आयएसआयने दिले आहेत.

गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांकडून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याने तसेच भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अद्याप सुरुच असल्याचे स्पष्ट केल्याने आयएसआय कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने मे 2025 मध्ये 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तानमध्ये घुसून जैश आणि लष्करचे अनेक तळ उद्ध्वस्त केले.

या कारवाईत बहावलपूर येथील जैशच्या मुख्यालयाचेही मोठे नुकसान झाले होते. हाफिज सईद आणि मसूद अजहर हे दोघेही संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेले जागतिक दहशतवादी असून, मुंबईतील 26/11 हल्ला, संसद हल्ला, पठाणकोट आणि पुलवामा हल्ल्यांचे ते मुख्य सूत्रधार आहेत. पाकिस्तान जरी हाफिज सईद कोट लखपत तुरुंगात असल्याचा दावा करत असला, तरी या ताज्या घडामोडीमुळे पाकिस्तानचा दहशतवादाला आश्रय देणारा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर उघड झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 Cricket: गोव्याच्या फलंदाजांचा सूर हरपला; विदर्भाची 7 विकेट्सनी सहज बाजी

Indian Football League: धेंपो क्लबसमोर गोल करण्याचे आव्हान; विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी चानमारी एफसीशी लढत

Mental Wellbeing: गोंगाटाच्या जगात मनाला हवे एक अदृश्य अंगण; स्वतःसाठी जपलेला शांततेचा कोपरा

गोवा खरोखरच 'मेला' आहे का? वाढती गुन्हेगारी, महिलांची असुरक्षितता आणि पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न

Goa Politics: शिवराळ भाषा, सालस थापा आणि राजकीय सभ्यता; गोव्याच्या राजकारणाचा नवा चेहरा!

SCROLL FOR NEXT