Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

''इम्रान खान अन् पत्नी बुशरा बीबीने घेतली सहा अब्जांची लाच''

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या सरकारवर अविश्वास प्रस्तावाची टांगती तलवार आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारवर अविश्वास प्रस्तावाची टांगती तलवार आहे. खान यांच्या अडचणी एकापाठोपाठ वाढतच चालल्या आहेत. इम्रान खान सरकार यांच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला असतानाच आता त्यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. अविश्वास प्रस्तावामुळे त्यांची खुर्ची आधीच धोक्यात आली आहे. दुसरीकडे, लाच घेतल्याच्या आरोपामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा डाग लागू शकतो. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) च्या उपाध्यक्षा मरियम नवाज (Maryam Nawaz) यांनी इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, मरियम नवाझ यांनी शनिवारी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यावर सहा अब्ज पाकिस्तानी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानचे (Pakistan) तीन वेळा पंतप्रधान राहिलेले नवाझ शरीफ यांच्या कन्येने लाहोरमधील मॉडेल टाऊनमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना हे आरोप केले. त्याचवेळी गृहमंत्री शेख रशीद यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान इम्रान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर नॅशनल असेंब्लीत मतदान 3 किंवा 4 एप्रिलला होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाल्या मरियम नवाज?

मरियम म्हणाल्या, “मी फराहचे नाव घेत आहे, (Bushra Bibi's friend) जिने बदल्या आणि नियुक्तींमध्ये लाखो रुपये घेतले आहेत. आणि विशेष म्हणजे ही प्रकरणे थेट बनीगाला (With Prime Minister Khan's residence) संबंधित आहेत. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या नेतृत्वाखालील सरकार अविश्वास प्रस्तावाद्वारे पदच्युत केल्यानंतर भ्रष्टाचाराची आणखी प्रकरणे समोर येतील. शनिवारी मरियम यांनी लाहोर ते इस्लामाबादपर्यंत त्यांच्या पक्षाच्या भ्रष्टाचारविरोधी मोर्चाचे नेतृत्व केले.'' इम्रान खान यांच्यावर जोरदार हल्ला चढवताना मरियम म्हणाल्या, "इमरान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील बदल्या आणि नियुक्त्यांसाठी हा सहा अब्ज रुपयांचा सर्वात मोठा घोटाळा आहे. आणि त्याचा थेट संबंध बनीगालाशी आहे."

शिवाय, पीएमएल-एनच्या उपाध्यक्षा मरियम म्हणाल्या, येत्या काही दिवसांत धक्कादायक पुरावे समोर येतील. सत्तेतून बाहेर पडताच आपली 'चोरी' पकडली जाण्याची भीती इम्रान खान यांना आहे. इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा बीबी, जिला 'बुशरा रियाझ' म्हणूनही ओळखले जाते. मरियम पुढे म्हणाल्या, "आम्हाला माहित आहे की, इम्रान खान सरकार वाचवण्यासाठी बनीगाला इथून जादूटोणा सुरु आहे, परंतु यामुळे कोणतीही मदत होणार नाही.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT