Marburg Virus Dainik Gomantak
ग्लोबल

Marburg Virus: मारबर्ग व्हायरसचा धोका, लस नाही, उपचार नाही, जाणून घ्या 5 मोठ्या प्रश्नांची उत्तरे

दैनिक गोमन्तक

आफ्रिकन देश घानामध्ये (Ghana) अत्यंत प्राणघातक मारबर्ग विषाणूच्या प्रकरणांची पुष्टी करण्यात आली आहे. पश्चिम आफ्रिकेतील घाना या देशात हा इबोलासदृश विषाणू प्रथमच आढळून आला. घानाच्या दक्षिणेकडील प्रदेशातून घेतलेल्या रुग्णाच्या रक्ताचे नमुने सेनेगलमध्ये तपासण्यात आले आहेत. (Marburg Virus Risk No Vaccine No Treatment Know 5 Big Questions Answered)

घाना आरोग्य सेवेने याबाबची पुष्टी केली आहे. द गार्डियनच्या मते, मारबर्ग विषाणूवर सध्या कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाहीये. तसेच त्यावर कोणताही इलाज नाहीये. वटवाघुळ यांसारख्या संसर्गजन्य प्राण्यांद्वारे त्याचा प्रसार होऊ शकतो तसेच कोरोनाव्हायरस साथीच्या आजारानंतर या आजाराची पुष्टी झाल्याने चिंतेत भर पडली आहे.

1. मारबर्ग विषाणू रोग किती प्राणघातक आहे? (MVD)

जरी एमव्हीडी मानवांमध्ये क्वचितच दिसत असले तरी, सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार मारबर्ग विषाणूचा मृत्यू दर 23-90% च्या दरम्यानचाच आहे.

2. मारबर्ग विषाणू रोग (MVD) ची लक्षणे?

त्याचा इन्क्यूबेशन कालावधी 2-21 दिवस एवढा आहे. मग अचानक ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी आणि स्नायू दुखणे, नंतर शरीरावर, विशेषतः छातीवर, पाठीवर आणि पोटावर लाल ठिपके दिसून येतात. चक्कर येणे, उलट्या होणे, छातीत दुखणे, घशात सूज येणे, ओटीपोटात दुखणे आणि जुलाब देखील होऊ शकतात. काहीवेळा त्याची लक्षणे कावीळ किंवा मलेरियामध्ये देखील असतात. जर स्थिती बिघडली तर यकृत निकामी होऊ शकते, रक्त गळती होऊ शकते आणि शरीराचे अनेक भाग देखील खराब होऊ शकतात.

3. याला मारबर्ग व्हायरस का म्हणतात?

Britannica.com च्या मते , 1967 च्या साथीच्या रोगादरम्यान सर्वाधिक 30 प्रकरणे असलेल्या मारबर्ग शहराच्या नावावरून हे नाव देण्यात आले. मारबर्ग रोगाचा RAVV विषाणू 1987 मध्ये केनियामध्ये 15 वर्षांच्या डॅनिश मुलामध्ये आढळून आला होता.

4. मारबर्ग आणि इबोला समान आहेत

मारबर्ग आणि इबोला एकमेकांपासून भिन्न आहेत, परंतु त्यांच्यात समान लक्षणे असू शकतात, ज्यामध्ये तापानंतर रक्तस्त्राव देखील होऊ शकतो. पण इबोला विषाणू मारबर्गपेक्षाही धोकादायक ठरू शकतो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.

5. मारबर्ग व्हायरसपासून संरक्षण कसे करावे?

मारबर्ग व्हायरस पासून संरक्षणासाठी पीपीई किट घातली पाहिजे. हातमोजे, तसेच मास्क घालावेत. बाधित व्यक्तीला कडक विलगीकरणात ठेवले पाहिजे आणि रुग्णासोबत वापरलेली उपकरणे योग्यरित्या निदान करून निर्जंतुकीकरण करायला हवे. संक्रमित प्राण्यांपासून दूर रहायला हवे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT