France Police Dainik Gomantak
ग्लोबल

France: पत्नीला अंमली पदार्थ देऊन बलात्कार करण्यासाठी बोलवले परपुरुष, 51 व्हिडिओ केले रेकॉर्ड

प्रकरण दाखल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणात आजवर 26 ते 73 वयोगटातील पन्नास पुरुषांना अटक केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फ्रान्समधून एक धक्कादायक आणि तितकीच किळसवाणी घटना समोर आली. एका पतीने चक्क स्वत:च्या पत्नीलाच रोज अंमली पदार्थ देऊन बाहेरच्या पुरूषांना तिच्यावर बलात्कार करण्यासाठी घरी बोलवले. द टेलिग्राफने याबाबत वृत्त प्रसारित केले असून, तब्बल दहा वर्षे हा प्रकार सुरू होता तसेच, तपासादरम्यान, 92 अशा प्रकरणांचा उलघडा झाला आहे.

प्रकरण दाखल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणात आजवर 26 ते 73 वयोगटातील पन्नास पुरुषांना अटक केली आहे. पोलिसांना संशयित आरोपी पुरूषांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

संशयित आरोपींमध्ये फायरमन, लॉरी ड्रायव्हर, म्युनिसिपल कौन्सिलर, बँकेतील आयटी कर्मचारी, जेल गार्ड, एक नर्स आणि पत्रकार यांचा समावेश आहे. तसेच, पोलिस यातील सहभागी लोकांचा शोध घेत आहेत.

द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी पत्नीच्या जेवणात औषध मिसळून ही घाणरेडे कृत्य करायचा असा आरोप केला जात आहे.

आरोपी त्याच्या घरी परपुरूषांना बोलवून पत्नीसोबत लैंगिक कृत्य करण्यास भाग पाडायचा. शिवाय त्याने 51 अशा लैंगिक कृत्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केले आहे. अशी माहिती समोर आली आहे.

2011 ते 2020 या दहा वर्षांच्या काळात या घटना घडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याचे लग्न होऊन अनेक वर्षे झाली आहेत, त्या दोघांना तीन मुले देखील आहेत. तीव्र वास येऊ नये म्हणून तंबाखू आणि परफ्यूम घरी घेऊन येत नसे. याशिवाय कोणाला संशय येऊ नये म्हणून देखील तो अधिक खबरदारी घेत होतो. असे तपासातून समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT