Eiffel Tower Dainik Gomantak
ग्लोबल

Eiffel Tower: 'अल्ला हू अकबर'चा नारा देत आयफेल टॉवरजवळ पर्यटकांवर हल्ला, जर्मन पर्यटकाचा मृत्यू

Eiffel Tower: फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरजवळ फिरणाऱ्या पर्यटकांवर एका व्यक्तीने चाकूने हल्ला केला.

Manish Jadhav

Eiffel Tower: फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरजवळ फिरणाऱ्या पर्यटकांवर एका व्यक्तीने चाकूने हल्ला केला. या घटनेत एका पर्यटकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डरमॅनिन यांनी सांगितले की, हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. स्थानिक मीडियानुसार, हल्लेखोराने गुन्हा करताना अल्लाह हु अकबरच्या घोषणा दिल्या होत्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या चौकशीत हल्लेखोराने असेही सांगितले की, तो अफगाणिस्तान आणि पॅलेस्टाईनमधील मुस्लिमांच्या हत्येमुळे त्रस्त आहे. त्याच्या मते गाझामध्ये पॅलेस्टिनींची कत्तल केली जात आहे. तेथील परिस्थितीमुळे तो खूप अस्वस्थ आहे. मात्र, स्थानिक संस्थांनी या प्रकाराला दुजोरा दिलेला नाही. या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. तपासानंतरच काही सांगता येईल, असेही गृहमंत्री म्हणाले.

गृहमंत्री गेराल्ड डरमॅनिन म्हणाले की, "पॅरिसमध्ये शनिवारी रात्री 9 वाजल्यानंतर एका व्यक्तीने क्वाई डी ग्रेनेलजवळ एका परदेशी पर्यटक जोडप्यावर हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात फिलीपिन्समध्ये जन्मलेल्या जर्मन पर्यटकाचा मृत्यू झाला. मात्र, त्याने त्याच्यासोबत उपस्थित महिलेवर हल्ला केला नाही. त्यानंतर तेथून जाणाऱ्या एका टॅक्सी चालकाने मध्यस्थी केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेला. त्यानंतर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याचा पाठलाग करुन त्याला अटक केली.

दुसरीकडे, स्थानिक मीडियाने स्थानिक पोलिसांचा हवाला देत कट्टरवादी हल्लेखोर इस्लामचा अनुयायी असल्याचे वृत्त दिले आहे. तो मानोरुग्ण असल्याचे दिसते. दुसरीकडे, या घटनेचा तपास अद्याप त्यांच्याकडे सोपवण्यात आलेला नाही, असे फ्रान्सच्या दहशतवादविरोधी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून फ्रान्समध्ये अशाप्रकारच्या अचानक हल्ल्याच्या घटना सामान्य झाल्या आहेत. गेल्या महिन्यातच अल्लाह हु अकबरचा नारा देताना एका कॉम्रेडने गोळीबार केला होता.

आफ्रिकन वंशाच्या मुलावर पोलिसांनी गोळी झाडली

यावर्षी 27 जून रोजी आफ्रिकन वंशाच्या नाहेल मर्झोक या मुलाची वाहतूक पोलिसाने गोळ्या झाडून हत्या केली होती. नाहेलच्या मृत्यूनंतर संपूर्ण फ्रान्समध्ये लोकांनी निदर्शने केली. विशेष म्हणजे, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ट्रॅफिक पोलीस नाहेलची गाडी थांबवत होता, पण तो थांबला नाही. यानंतर एका पोलिसाने त्याच्यावर गोळी झाडली. आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचे वकील लॉरेंट फ्रँक लिनार्ड यांनी सांगितले होते की, त्याने जाणूनबुजून हत्या केली नाही.

आयफेल टॉवर उडवण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या

दरम्यान, यावर्षी ऑगस्टमध्ये आयफेल टॉवर उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी संपूर्ण आयफेल टॉवर खाली केला होता. यासोबतच बॉम्ब निकामी पथकही घटनास्थळी तैनात करण्यात आले होते. आयफेल टॉवरच्या आसपास बॉम्बचा शोध घेण्यात आला, पण तो सापडला नाही. दुसरीकडे, या टॉवरच्या सुरक्षेबाबत बोलायचे झाल्यास, त्याच्या दक्षिण पिलरजवळ पोलिस ठाणे आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात आहे. पर्यटकांना संकुलात प्रवेश करण्यापूर्वी कडक सुरक्षा निगराणीतून जावे लागते.

रात्रीच्या वेळी आयफेल टॉवरजवळ फोटो काढण्याला बंदी आहे

आयफेल टॉवरचे बांधकाम जानेवारी 1887 मध्ये सुरु झाले होते, जे 31 मार्च 1889 रोजी पूर्ण झाले होते. 1889 च्या वर्ल्ड फेयरमध्ये दोन दशलक्ष पर्यटकांनी आयफेल टॉवर पाहिला होता. रात्री टॉवरजवळ फोटो काढण्याला बंदी आहे. यासह टॉवरचे दिवे कॉपीराइटच्या कक्षेत येतात. त्यामुळे एखाद्याला रात्रीच्या वेळी आयफेल टॉवरचे फोटो क्लिक करायचे असतील तर त्याला सरकारची परवानगी घ्यावी लागेल. दरम्यान, अशा संवेदनशील परिसरात गुन्हे घडणे चिंताजनक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT