China Landslide News Dainik Gomantak
ग्लोबल

China Landslide News: चीनच्या पर्वतीय भागात भूस्खलन; 44 लोकांचा मृत्यू, अनेक घरे उद्ध्वस्त

China Landslide News: चीनच्या पर्वतीय भागात मोठी दुर्घटना झाल्याची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये भूस्खलन झाले आहे.

Manish Jadhav

China Landslide News: चीनच्या पर्वतीय भागात मोठी दुर्घटना झाल्याची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये भूस्खलन झाले आहे. पर्वतीय भागात झालेल्या या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत 44 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. त्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. या भीषण भूस्खलनात मोठ्या प्रमाणात घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याचे वृत्त आहे. भूस्खलनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

दरम्यान, चीनमधील युनान या पर्वतीय भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. वास्तविक, भूस्खलनात 44 लोक ढिगाऱ्याखाली दबल्याचे वृत्त आहे. घटनास्थळावरुन 200 जणांची सुटका करण्यात आली आहे. मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरु आहे. भूस्खलनात अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना चीनच्या दक्षिण-पश्चिम प्रांत युनानमध्ये घडली. युनानमधील लियांगसुई गावात सोमवारी सकाळी सहा वाजता भूस्खलन झाले.

बचावकार्य सुरुच आहे

अपघाताचा परिसर झेनजियांग काउंटीमधील तांगफांग शहराचा आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु असल्याचे प्रशासनाने निवेदन जारी केले आहे. भूस्खलनात 18 घरे ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचे वृत्त आहे.

बाधित भागातून मोठ्या प्रमाणात लोकांची सुटका करण्यात आली

दरम्यान, बाधित भागातून मोठ्या प्रमाणात लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. भूस्खलनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. चीनच्या युनान प्रांतात भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. हा चीनचा एक अतिदुर्गम भाग आहे, जिथे मोठे पर्वत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dattwadi Temple: 'प्रशासन चुकले, मामलेदारांविरोधात तक्रार करणार'! साखळीतील मूर्ती चोरी प्रकरणाला वेगळे वळण

Love Horoscope Today: रवि योग आणि नीचभंग राजयोगाचा 'या' राशींच्या लव्ह लाईफवर होणार परिणाम!

Taxi Aggregator: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर'बाबत फेरविचार करावा! पायलट संघटनेची मागणी; पारंपरिक व्यावसायिकांना फटका बसण्याची भीती

Yuri Alemao: 'राज्य सरकार बहुजनविरोधी, 2027 निवडणुकीत भाजपचा होणार दारूण पराभव'; LOP आलेमाव यांचा घणाघात

Shirgao: बळीराजा संकटात! शिरगावात भातशेती पाण्याखाली; पावसाच्या तडाख्याने रोपे मातीमोल

SCROLL FOR NEXT