ship catches fire DainikGomantak
ग्लोबल

जहाजाला लागली आग, शेकडो आलिशान गाड्यांचा धूर

जहाजात ऑडी आणि लॅम्बोर्गिनी ब्रँडची 3,965 वाहने होती

दैनिक गोमन्तक

फोक्सवॅगन ग्रुपची हजारो वाहने वाहून नेणारे फेलिसिटी एस या मालवाहू जहाजाला बुधवारी दुपारी अटलांटिक महासागरातील अझोरेस बेटाजवळ आग लागली. नौदलाच्या निवेदनानुसार, जहाजातील 22 जणांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले. त्यांना जवळच्याच हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे.

वृत्तानुसार, फोक्सवॅगन यूएसएच्या अंतर्गत ईमेलमध्ये असे म्हटले आहे की जहाजात ऑडी आणि लॅम्बोर्गिनी ब्रँडची 3,965 वाहने होती.

फॉक्सवॅगनने जहाजावरील (ship) कारच्या संख्येची माहिती दिली नाही, परंतु जहाजावर सुमारे 1,100 कार होत्या. वृत्तानुसार हे जहाज डेव्हिसविले, रोड आयलंडमधील फोक्सवॅगन कारखान्यात जात होते.

कंपनीच्या म्हणण्यानुसार फेलिसिटी एसेसमध्ये सुमारे 1,100 वाहने होती. आगीच्या (fire) घटनेमुळे या वाहनांच्या ग्राहकांशी मोबाईलद्वारे संपर्क साधला जात आहे. सर्वच्या सर्व म्हणजे 22 कर्मचारी सुरक्षित आहेत हे या अपघातातील दिलासादायक वृत्त आहे.

समुद्रात (sea) माल गमावण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 मध्ये जेव्हा ग्रॅन्डे अमेरिके जहाजेला आग लागली आणि तेही जहाज यात बुडाले होते, तेव्हा ऑडी आणि पोर्शेसह 2,000 हून अधिक लक्झरी गाड्या त्यात बुडाल्या होत्या. यासंदर्भात काही ग्राहकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT