Los Angeles News Dainik Gomantak
ग्लोबल

Los Angeles: अमेरिकेत स्थलांतरितांच्या संतापाचा भडका! वाहनांची जाळपोळ, दगडफेक; लॉस एंजेलिसमध्ये मोठे आंदोलन

Los Angeles Protest: नागरिकांनी महामार्ग रोखत अनेक चारचाकी वाहने पेटवून दिली. जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा आणि रबरी गोळ्यांचा वापर करावा लागला.

Sameer Panditrao

लॉस एंजेलिस: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतरविरोधी कारवाईदरम्यान आज हिंसाचार झाला. लॉस एंजेलिस येथे मागील तीन दिवसांपासून बेकायदा स्थलांतरितांविरोधात कारवाई सुरू असताना आज येथे तीनशेहून अधिक सैनिकांना तैनात केल्याने सामान्य नागरिकांच्या संतापाचा भडका उडाला.

नागरिकांनी महामार्ग रोखत अनेक चारचाकी वाहने पेटवून दिली. जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा आणि रबरी गोळ्यांचा वापर करावा लागला. लॉस एंजेलिस येथे स्थलांतरितांविरुद्ध कारवाई सुरू असून दोन दिवसांत काही जणांना ताब्यात घेण्यात आले. या ताबा केंद्रांभोवती पहारा ठेवण्यासाठी आणि सरकारी इमारतींचे संरक्षण करण्यासाठी तीनशेहून अधिक सैनिकांना तैनात करण्यात आले होते.

मात्र, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण होऊन ते मोठ्या संख्येने रस्त्यावर आले. लोकांनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक करत पोलिसांच्या आणि इतर काही वाहनांची जाळपोळ केली. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली.

दिवसाअखेरीस मात्र आंदोलक पांगल्यानंतर काही जणांना अटक करण्यात आली. अध्यक्ष ट्रम्प यांनी या प्रकरणाची दखल घेत प्रशासनाला कठोरपणे कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

लॉस एंजेलिस हे शहर कॅलिफोर्निया प्रांतात आहे. या प्रांताच्या गव्हर्नरने सैनिक तैनात करण्याची विनंती केलेली नसतानाही ट्रम्प यांनी स्वत:हून तो निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयावर स्थानिक नेत्यांनीही टीका केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

Goa Live News: देवसडा- धारबांदोडा अपघात; पळून गेलेल्या चालकाचा शोध सुरु

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

SCROLL FOR NEXT