Longest Day of the Year 2023:  Dainik Gomantak
ग्लोबल

Longest Day of the Year 2023: आज वर्षातील सर्वात मोठा दिवस, जाणून घ्या या मागील कारण

आज वर्षातील सर्वात मोठी दिवस आहे कारण या दिवशी सूर्योदय लवकर होतो तर सूर्यास्त उशिरा होतो.

Puja Bonkile

Longest Day of the Year 2023: आजचा दिवस खूप खास आहे. कारण हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा आहे. आता सर्वात मोठा दिवस असल्याने, 21 जून रोजी सूर्यास्त उशिरा असल्याने रात्र लहान असते. पण असं का म्हटलं जातं, त्यामागील वस्तुस्थिती किंवा विज्ञान काय आहे, ते समजून घेऊया.

या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर सर्वात जास्त काळ राहतात. शास्त्रज्ञांच्या मते, या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर सुमारे 15 ते 16 तास राहतात. यामुळे 21 जूनचा दिवस इतर दिवसांच्या तुलनेत किती मोठा आहे याची कल्पना येऊ शकते. यामुळेच या दिवसाला वर्षातील सर्वात मोठा दिवस असेही म्हटले जाते. 

या दिवशी सूर्य (Sun) पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात असतो. त्यामुळे सूर्यप्रकाश थेट भारताच्या मध्यातून जाणाऱ्या कर्कवृत्त उष्ण कटिबंधावर पडतो. यामुळे, उत्तर गोलार्धात असलेल्या सर्व देशांमध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान आहे.

पण, 21 सप्टेंबरपासून दिवस आणि रात्र समान होतील. यानंतर 23 सप्टेंबरपासून रात्र मोठी आणि दिवस लहान होण्याची प्रक्रिया सुरू होते. विशेष म्हणजे या दिवशी एक वेळ अशी येते की तुमची सावली तुमची साथ सोडते. 

हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की 21 जूनलाच दिवस मोठा आणि रात्र छोटी का? अशा परिस्थितीत या लेखाद्वारे आम्ही तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. 

  • वर्षातील सर्वात मोठा दिवस कधी असतो?

21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी रात्र सर्वात लहान आणि दिवस सर्वात मोठा असतो. शास्त्रज्ञांच्या मते, या दिवशी सूर्य उत्तर गोलार्धातून भारताच्या मध्यभागी कर्क उष्ण कटिबंधात येतो.

त्यामुळे सूर्याची किरणे पृथ्वीवर सर्वाधिक काळ राहतात. यामुळेच या दिवशी रात्र लहान आणि दिवस मोठा असतो. वैज्ञानिकदृष्ट्या, या दिवशी सूर्याची किरणे सुमारे 15 ते 16 तास राहतात.

  • 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस का आहे?

21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस का आहे?  कारण 21 जूनच्या काही दिवस आधी दिवसाची लांबी मोठी होऊ लागते आणि 21 जून हा सर्वात मोठा दिवस मानला जातो.

  • सावली तुम्हाला सोडून जाते

21 जूनचा दिवस लांबल्याने सावलीही काही काळ साथ सोडते. सूर्य जेव्हा प्रदक्षिणा करत कर्क राशीत येतो, तेव्हा सूर्य पृथ्वीपासून खूप दूर जातो. त्यामुळे सावलीही काही काळ नाहीशी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT