Population Dainik Gomantak
ग्लोबल

England: इंग्लंडच्या इतिहासात पहिल्यांदाच ख्रिश्चनांच्या लोकसंख्येत मोठी घट!

England: इंग्लड आणि वेल्समध्ये नुकत्याच झालेल्या जनगणनेनुसार ख्रिश्चनांची लोकसंख्या 13 टक्क्यांपेक्षा कमी दर्शवली गेली आहे.

दैनिक गोमन्तक

Christian Population: इंग्लडच्या इतिहासात पहिल्यांदाच ख्रिश्चनांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या निम्मी झाली आहे. इंग्लड आणि वेल्समध्ये नुकत्याच झालेल्या जनगणनेनुसार ख्रिश्चनांची लोकसंख्या 13 टक्क्यांपेक्षा कमी दर्शवली गेली आहे. दुसरीकडे मात्र, हिंदू आणि मुस्लीम धर्मीयांच्या लोकसंख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर धर्म न मानणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

दरम्यान, ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स (ONS) 2021 च्या जनगणनेत पहिल्यांदाच इंग्लड आणि वेल्समधील अर्ध्यापेक्षा कमी लोकांनी स्वत:चा धर्म ख्रिश्चन (Christian) म्हणून उल्लेख केला आहे. मागच्या म्हणजेच 2011 च्या जनगणनेत 59.3 टक्के ख्रिश्चन होते. तेच प्रमाण आता 46.2 टक्क्यांवर (2.75 कोटी) आले आहे. म्हणजेच, ख्रिश्चनांच्या लोकसंख्येत 13.1 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्याचबरोबर 2011 मध्ये मुस्लीम धर्मीयांची लोकसंख्या 4.9 टक्के इतकी म्हणजेच 27 लाख होती. ती आता वाढून 6.5 टक्के इतकी म्हणजेच 39 लाख झाली आहे.

दुसरीकडे, हिंदूच्या (Hindu) लोकसंख्येत सुद्धा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 2011 च्या जनगणनेनुसार 1.5 टक्क्यांवरुन 1.7 टक्क्यांनी वाढली आहे. महत्वाचे म्हणजे, कोणताच धर्म न मानणाऱ्यांची लोकसंख्या 37.2 टक्के झाली आहे, जी एक चतुर्थांशपेक्षा जास्त आहे.

तसेच, दर दहा वर्षानंतर ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स द्वारा जनगणना केली जाते. ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सच्या रिपोर्टनुसार, शीखांच्या लोकसंख्येतदेखील वाढ झाली आहे. 2011 मध्ये जवळजवळ 4 लाख 23 हजार लोकसंख्या होती ती आता 5 लाख 24 हजार झाली आहे. इंग्लड आणि वेल्समध्ये बौद्ध धर्मीयांच्या लोकसंख्येत सुद्धा वाढ झाली आहे. 2011 मध्ये 0.4 टक्के असणारी लोकसंख्या 0.5 टक्के झाली आहे. मात्र यहुदींच्या लोकसंख्येत कोणताही बदल झाला नसल्याचे ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट्समधून स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT