Bangladesh Violence Dainik Gomantak
ग्लोबल

बांगलादेशात क्रूरतेचा कळस! 50 वर्षीय हिंदू व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी हल्ला करुन दिलं पेटवून; 31 डिसेंबरची रात्र ठरली 'काळरात्र'

Bangladesh Violence: बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरील अत्याचाराची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये.

Manish Jadhav

Bangladesh Violence: बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरील अत्याचाराची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. 2025 या वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी बांगलादेशातील शरियतपूर जिल्ह्यात एका हिंदू व्यक्तीवर धर्मांध जमावाने अत्यंत निर्घृण हल्ला केला. 50 वर्षीय खोकन दास असे या पीडित व्यक्तीचे नाव असून त्यांना केवळ बेदम मारहाणच करण्यात आली नाही, तर अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमुळे बांगलादेशातील हिंदू समुदायामध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

काय आहे नेमकी घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, खोकन दास हे 31 डिसेंबरच्या सायंकाळी आपल्या वैयक्तिक कामानिमित्त बाहेर गेले होते. ते आपल्या घरी परतत असताना शरियतपूर जिल्ह्यातील एका निर्जन ठिकाणी सशस्त्र धर्मांधांच्या जमावाने त्यांना घेरले. या जमावाकडे धारदार शस्त्रे आणि लाठ्या-काठ्या होत्या. काहीही विचारण्याआधीच जमावाने खोकन दास यांच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यास सुरुवात केली.

हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेले खोकन दास रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही जमावाचे समाधान झाले नाही. या हिंसक जमावाने क्रूरतेची सीमा ओलांडत जखमी अवस्थेत असलेल्या दास यांना आग लावून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

हिंदू समुदायामध्ये दहशतीचे वातावरण

बांगलादेशात सत्तांतर झाल्यापासून हिंदू मंदिरे, घरे आणि व्यक्तींना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. शरियतपूरमधील ही घटना त्याच साखळीचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. खोकन दास हे केवळ आपल्या घरी परतत होते, त्यांचा कोणाशीही वाद नव्हता, तरीही केवळ धर्माच्या आधारावर त्यांना लक्ष्य करण्यात आले, असा आरोप स्थानिक हिंदू संघटनांनी केला आहे. या भीषण कृत्यामुळे बांगलादेशातील मानवाधिकार आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चेत आला आहे.

प्रशासनाची भूमिका आणि आंतरराष्ट्रीय पडसाद

या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी, अद्याप कोणत्याही मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलेली नाही. बांगलादेशातील अल्पसंख्याक हक्क गटांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

विशेष म्हणजे, 31 डिसेंबर रोजी जगभरात लोक नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करत असताना बांगलादेशात मात्र एका निष्पाप हिंदू व्यक्तीला आगीच्या हवाली करण्यात आले, याबद्दल सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. भारतातूनही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने आणि भारत सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Jatra: म्हापशात प्रशासनाचा बडगा! श्री बोडगेश्वर जत्रोत्सवातील जायंट व्हील्ससह 20 राईड्स सील; सुरक्षेच्या कारणास्तव मोठी कारवाई

पिढ्यांमधील अंतर आणि मनाचा समतोल: सुखी म्हातारपणाची गुरुकिल्ली

लग्नाच्या मांडवात राडा! नवऱ्या मुलाला किस करणाऱ्या 'एक्स'ला नवरीनं भर मंडपात धोपटलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

India Pakistan Nuclear List: तणावाच्या वातावरणातही भारत-पाकिस्तानने जपली 35 वर्षांची परंपरा; अणुयादीच्या देवाणघेवाणीने जगाचे वेधले लक्ष

VIDEO: कळंगुटमध्ये पर्यटकांपेक्षा तंबाखू-दारु पिऊन फिरणाऱ्यांचीच 'तोबा' गर्दी, सरत्या वर्षाला अशा प्रकारे निरोप; गर्दीचे विदारक वास्तव मांडणारा व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT