Khalistani Conspiracy Dainik Gomantak
ग्लोबल

Khalistani Conspiracy: सोशल मीडिया बनले हत्यार, PAK च्या मदतीने खलिस्तान्यांनी रचला भारताविरुध्द कट

Khalistani Terrorists: पाकिस्तान, कॅनडा आणि अमेरिकेत बसून फुटीरतावादी गट भारताविरुद्ध धोकादायक खलिस्तानी कट रचत असल्याचा इशारा सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Khalistani Conspiracy: पाकिस्तान, कॅनडा आणि अमेरिकेत बसून फुटीरतावादी गट भारताविरुद्ध धोकादायक खलिस्तानी कट रचत असल्याचा इशारा सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बनावट हँडल या कटाचा प्रसार करण्यात गुंतले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात बनावट हँडल सक्रिय आहेत. या बनावट सोशल मीडिया हँडलवर भारताविरोधातील आर्टिकल पोस्ट केले जातात.

सोशल मीडियावर हजारो पोस्ट्स केल्या जात आहेत

29 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर खलिस्तानच्या नावाने 8,332 पोस्ट करण्यात आल्या, त्यापैकी बहुतांश पोस्टची ठिकाणे पाकिस्तानमध्ये आढळून आली आहेत. त्याचप्रमाणे, 15 डिसेंबर रोजी खलिस्तानच्या नावावर एकूण 8707 पोस्ट होत्या, त्यापैकी बहुतेक पोस्टचे स्थान पाकिस्तान आणि अमेरिका (America) होते.

काश्मीरवर चुकीच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत

विशेष म्हणजे, ज्या सोशल मीडिया हँडलवरुन खलिस्तानच्या नावाने पोस्ट केल्या जात आहेत, त्यामध्ये काश्मीरबाबत भारताविरोधात (India) चुकीच्या गोष्टी लिहिल्या जात आहेत.

खलिस्तानी पाकिस्तानची मदत घेत आहेत

भारतातील खलिस्तानी कट फसल्याने खलिस्तानी गट नाराज असून, त्यांचा कट यशस्वी करण्यासाठी ते पाकिस्तानी लोकांची मदत घेत आहेत, असे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

SCROLL FOR NEXT