Kabul Blast Dainik Gomantak
ग्लोबल

Kabul Blast: काबूलमध्ये नमाजच्या वेळी मशिदीत स्फोट, अनेकांचा मृत्यू

Kabul Blast: काबूल शहराच्या पश्चिमेकडील कोहाट-ए-सांगी येथे शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी मशिदीत स्फोट झाला.

दैनिक गोमन्तक

Kabul Blast: काबूल शहराच्या पश्चिमेकडील कोहाट-ए-सांगी येथे शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी मशिदीत स्फोट झाला. प्राथमिक अहवालात अनेक लोक मृत आणि जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटात किती लोक मारले गेले याची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, 12 डिसेंबर रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका हॉटेलमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या हल्ल्यात 5 जण ठार झाले होते. तर इमर्जन्सी एनजीओच्या वतीने ट्विट करुन 21 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे, रुग्णालयात येण्यापूर्वीच तीन जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

तसेच, अफगाणिस्तानमध्ये तालिबान (Taliban) या दहशतवादी संघटनेचे सरकार आहे, परंतु ISIS सारख्या भयानक दहशतवादी संघटनाही तिथे सक्रिय आहे, ज्यांना चीनबद्दल (China) प्रचंड द्वेष आहे.

महत्त्वाचे म्हणजे, ऑगस्ट 2021मध्ये अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर तिथे तालिबान राजवट आहे. तालिबान सातत्याने दावा करत आहे की, आम्ही देशात मजबूत सुरक्षा व्यवस्था पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु ते पूर्णपणे अपयशी ठरताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अफगाणिस्तानात अनेक ठिकाणी गोळीबार आणि स्फोटांची मालिका अव्याहतपणे सुरु आहे. ISIS या दहशतवादी संघटनेने यातील अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT