Former Footballer Shumaila Sattar Dainik Gomantak
ग्लोबल

Jinnah House Attack: जिना हाऊस हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानची माजी फुटबॉलपटू शुमैला सत्तारला अटक

Former Footballer Shumaila Sattar: पोलिसांनी न्यायालयीन कोठडी मागितल्यानंतर शुमैलाला अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आले.

Manish Jadhav

Jinnah House Attack: पाकिस्तानची माजी फुटबॉलपटू शुमैला सत्तारला पोलिसांनी अटक केली आहे. 9 मे रोजी जिना हाऊस हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हजारो लोकांमध्ये तिचा समावेश आहे.

पोलिसांनी न्यायालयीन कोठडी मागितल्यानंतर शुमैलाला अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आले. जिओ-फेन्सिंगद्वारे तिची ओळख पटली. लाहोर येथील तिच्या घरावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले.

पाच JIT ची निर्मिती

यापूर्वी, पंजाबच्या गृह विभागाने लाहोरमधील (Lahore) कॉर्प कमांडर हाऊस (जिना हाऊस) वरील हल्ल्याच्या तपासासाठी पाच स्वतंत्र संयुक्त तपास पथके (जेआयटी) स्थापन केली होती. विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पाच जेआयटी उच्च सुरक्षा क्षेत्रामध्ये तोडफोड आणि जाळपोळीची चौकशी करतील.

इम्रान खान यांचीही चौकशी करण्यात आली

दरम्यान, 9 मे रोजी झालेल्या जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटनांबाबत माजी पंतप्रधान इम्रान खान यांची चौकशी केली जात आहे. JIT 9 मेच्या घटनांमध्ये इम्रान यांच्या भूमिकेची चौकशी करत आहे.

पंजाब सरकारने हिंसाचाराच्या घटनांशी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र जेआयटी स्थापन केल्या आहेत. हिंसक घटनांसंदर्भात विविध पोलिस (Polie) ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये इम्रान खान यांच्या नावाचाही समावेश आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

इम्रान यांना 9 मे रोजी अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतर, पीटीआय कार्यकर्त्यांनी इस्लामाबाद, रावळपिंडी, लाहोर, कराची, गुजरांवाला, फैसलाबाद, मुलतान आणि पेशावरसह देशभरातील शहरांमध्ये हिंसक निदर्शने केली.

यादरम्यान खान यांच्या समर्थकांनी लष्करी प्रतिष्ठानांची तोडफोड करुन आग लावली. त्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT