Fumio Kishida Dainik Gomantak
ग्लोबल

फुमिओ किशिदांनी जपानी संसद केली बरखास्त, 31 ऑक्टोबरला होणार संसदीय निवडणुका

जपानच्या पंतप्रधानांनी कोरोना महामारीवर (Covid19) मात करत देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

जपानचे (Japan) पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांनी संसदेचे कनिष्ठ सभागृह बरखास्त केले आहे. त्यामुळे आता 31 ऑक्टोबर रोजी देशातील राष्ट्रीय निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीमुळे किशिदांच्या नावावर अधिकृतपणे शिक्कामोर्तबही होईल. राजकीय तज्ञांच्या मते, जपानच्या पंतप्रधानांनी कोरोना महामारीवर मात करत देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. किशिदा यांच्या मते, कमकुवत विरोधामुळे कोरोना महामारीशी (Covid 19) लढताना खूप अडचणी आल्या आहेत.

नवीन पंतप्रधान किशिदा यांना जपानी जनतेचा पुरेसा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांना देशात लोकप्रियता मिळत असल्याचेही सर्वेक्षणाच्या निकालांवरुन स्पष्ट झाले आहे. लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (LDP) आणि त्यांचा सहयोगी पक्ष कॉमिटो यांच्यासह कनिष्ठ सभागृहात, ते सहज बहुमताचे लक्ष्य साध्य करु शकतात असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.

लोकांच्या आशा किशिदा यांच्यावर

जपानच्या मतदारांना आता असे सरकार हवे आहे जे निर्णायक निर्णय घेऊ शकेल. आणि त्याच वेळी देशाची अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न देखील करेल. अलीकडेच, सेनकेई वृत्तपत्राने केलेल्या एका सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले की, 48 टक्के लोकांना कीशिदा प्रशासनाने कोरोना महामारीवर जास्तीत जास्त काम करावे आणि नंतर देशाची अर्थव्यवस्था पठडीवर आणावी, त्यानंतर देशात रोजगार कसा वाढेल यासाठी प्रयत्न करावा असं वाटत आहे.

किशिदा यांचा पक्ष या वर्षापर्यंत मुखाद्वारे देण्यात येणारी लस उपलब्ध करुन कोरोनाला नियंत्रित करण्याच्या उपायांवर अधिक लक्ष केंद्रित करेल असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे. त्याच वेळी, किशिदा यांचे उद्दिष्ट नव्या भांडवलशाहीचा स्वीकार करत देशाची आर्थिक स्थिती सुधारुन पुन्हा भांडवल निर्मिती करणे हा आहे. शकते. सत्ताधारी पक्षाने अशीही मागणी केली आहे की, देशाचा संरक्षण खर्च झपाट्याने वाढवावा जेणेकरुन त्या क्षेत्राची क्षमता विकसित करण्यास मदत होईल. तसेच चीनच्या आक्रमकतेला आळाही घालता येईल.

नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार

योशिहिदे सुगा यांची जागा किशिदा यांनी घेतली आहे. सुगा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आदल्या दिवशी राजीनामा दिला. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर कोरोना संकट हाताळण्याच्या पद्धतींमुळे आणि कोरोनाचं सावट असतानाही ज्या पध्दतीने ऑलिम्पिक सामन्यांचे आयोजन करण्यात आले त्यामुळे सुगा यांच्याविरोधात जपानी जनतेमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. सुगा यांनी केवळ एका वर्षानंतर पदावर असताना राजीनामा दिला. दरम्यान जपानचे माजी परराष्ट्र मंत्री किशिदा यांनी सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षनेते पदाची निवडणूकही सहज जिंकली होती.

किशिदा जपानच्या राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेता देशातील आर्थिक स्थिती हाताळण्याच्या उद्देशाने नवीन मंत्रिमंडळ तयार करतील आणि संसदेत तुलनेने नवीन असलेल्या 46 वर्षीय ताकायुकी कोबायाशी यांची नियुक्ती करतील. किशिदा यांचे अमेरिकेशी संबंध चांगले आहेत. तसेच आशिया आणि युरोपमधील इतर समविचारी देशांच्या भागीदारीचे समर्थनही ते करतात. चीन आणि आण्विक सशस्त्र उत्तर कोरियाचा सामना करणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जपानमधील निवडणुका आधी नोव्हेंबरच्या मध्यावर होणार होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

Goa Politics: भाजपला तिसऱ्या आघाडीची भीती नाही! दामू नाईकांचा विरोधकांना टोला; '2027 मध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येणार'

Goa Congress: काँग्रेसची 'गोवा राखण यात्रा' 22 सप्टेंबरपासून! 27 दिवसांत सर्व 40 मतदारसंघांचा दौरा; जमीन, पर्यावरण आणि अस्मितेसाठी लढ्याची घोषणा

Guru Mangal Yuti 2026: 18 सप्टेंबरला महाचमत्कार! गुरु-सेनापती युतीनं चमकणार 4 राशींचं नशीब; हाती लागणार कुबेराचा खजिना

SCROLL FOR NEXT