अमेरिकेला शह देणारा हा नेता होणार इराकचा नवा पंतप्रधान?

अमेरिकन सैन्याविरोधात मोहिमेचे नेतृत्व करणारे अल सदर सध्याच्या निवडणुकीत 329 सदस्यीय संसदेत बहुतांश जागांवर आघाडीवर आहेत.(Iraq Election)
Iraq Election: Shia leader Muqtada al-Sadr may win
Iraq Election: Shia leader Muqtada al-Sadr may win Dainik Gomantak
Published on
Updated on

इराकमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या (Iraq Election) निकाल आता हळू हळू समोर येत आहेत,या निवडणुकीत शिया धर्मगुरू मुक्तादा अल-सदर (Muqtada al-Sadr) यांना संसदेतील (Iraq Parliament) बहुतांश जागांवर आणि देशातील सर्वच्या सर्व 18 प्रांतांमध्ये बहुमत मिळवताना दिसत आहेत . राजधानी बगदादसह (Bagdad) साऱ्या ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे, इराण (Iran) समर्थक आघाडीचे उमेदवार निकालात मागे आहेत. 2003 मध्ये अमेरिकन सैन्याविरोधात (USA Army) मोहिमेचे नेतृत्व करणारे अल सदर सध्याच्या निवडणुकीत 329 सदस्यीय संसदेत बहुतांश जागांवर आघाडीवर आहेत.(Iraq Election: Shia leader Muqtada al-Sadr may win)

इराणी समर्थक, हादी अल-अमेरीच्या नेतृत्वाखालील फतह आघाडीने 2018 च्या निवडणुकीत 48 जागा जिंकल्या पण त्यांना अजून किती जागा पराभवाला सामोरे जावे लागत आहे हे अद्याप माहित नाही . या निवडणुकीत 41 टक्के मतदान झाले आहे . इराकमधील नागरिकांनी रविवारी संसदेसाठी मतदान केले, परंतु देशातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता . देशातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापनाच्या विरोधात लोकं 2019 च्या शेवटी बगदाद आणि देशाच्या दक्षिणेकडील प्रांतांच्या रस्त्यावर देखील उतरले होते .

Iraq Election: Shia leader Muqtada al-Sadr may win
तालिबानला मान्यता नाहीच, पण.... अमेरिकेनं दिलं स्पष्टीकरण

देशातील अनेक नागरिकांनी देशात सत्ता बदल आणि नवीन निवडणुकांची मागणी केली होती. 2003 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील हल्ल्यात सद्दाम हुसेनला सत्तेतून बेदखल केल्यापासून इराक आता सहाव्यांदा निवडणूक घेत आहे. मात्र तरुण इराकी मतदानासाठी तयार असल्याचे दिसून आले नाही. अनेक तरुणांचे म्हणणे आहे की निवडणुकीनंतरही तेच जुने चेहरे आणि पक्ष परत येतील, जे अनेक दशकांपासून इराकमध्ये भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार करत आहेत. या निवडणुकीत 329 जागांसाठी एकूण 3,449 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.

सध्याच्या निवडणुकीत इराकी नेते अल सद्र यांना लोकांचा आवडता धार्मिक नेता म्हणून ओळखले जाते, अमेरिकेच्या आक्रमणानंतर इराकी राजकारणातील एक प्रमुख चेहरा आणि किंगमेकर ते राहिले आहेत . त्यांनी आतापर्यंत इराकमध्ये परकीय हस्तक्षेपाच्या सर्व प्रकारांना विरोध केला आहे, मग तो अमेरिकेचा असो, ज्याच्या विरोधात 2003 पासून सशस्त्र बंडखोरी लढली होती. किंवा शेजारच्या इराणचा हस्तक्षेप, ज्यावर त्याने इराकी राजकारणातील जवळच्या सहभागाबद्दल टीका केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com