Japanese People Dainik Gomantak
ग्लोबल

Shinzo Abe Death: का म्हणतात जपानला शांतताप्रिय देश?

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येनंतर संपूर्ण जग हादरले आहे.

दैनिक गोमन्तक

Shinzo Abe Death: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येनंतर संपूर्ण जग हादरले आहे. जपानसारख्या शांतताप्रिय देशात रक्तपाताची घटना घडवू शकते, यावर तेथील लोकांचा विश्वास बसत नाहीये. सर्वात प्रसिद्ध आणि आवडत्या नेत्यावर अशा प्रकारचा हल्ला झाल्याने जपानी नागरिकांना धक्का बसला आहे. खरंतर जपान असा देश आहे, जिथे तिथे राहणारे लोक शांततेत आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करतात.

दरम्यान, जपानमध्ये (Japan) तुम्हाला बंदूकीचा परवाना घ्यायचा असेल तर तेथील कायदे याबाबत खूप कडक आहेत. इथे कोणत्याही नागरिकाला (Citizen) बंदूकीचा परवाना घेण्यासाठी कठोर प्रक्रियेतून जावे लागते. शांतताप्रिय देश असल्याने आणि कमी हिंसक घटनांमुळे फार कमी लोक स्वसंरक्षणासाठी बंदूकीचा परवाना घेतात. आबे यांच्यावर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेली बंदूक विनापरवाना शस्त्र कायद्यातर्गंत खरेदी करण्यात आली होती. विशेष म्हणजे ही बंदूक स्वदेशी बनावटीची आहे.

शिंजो आबे यांच्यावर हल्ला करणार कोण आहे?

शिंजो आबे यांना गोळ्या घालणाऱ्या व्यक्तीचे नाव तेत्सुया यामागामी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर 41 वर्षीय तेत्सुया यामागामी पळून गेला नाही. शिंजो आबे यांच्या अंगरक्षकांनी आणि पोलिसांनी त्याला घटनास्थळावरुन शस्त्रांसह अटक केली.

दुसरीकडे, तेत्सुया यामागामीने चौकशीदरम्यान पोलिसांना (Police) सांगितले की, मी शिंजो आबे यांच्यावर खूश नव्हतो. त्यांना मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला. जपानी संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दावा केला आहे की, हल्लेखोर तेत्सुया यामागामी सेल्फ डिफेन्स फोर्सचा माजी सदस्य होता. त्याने 2002 ते 2005 या काळात सेल्फ डिफेन्स फोर्समध्ये काम केले होते.

जपानी लोक शांत जीवन जगण्यावर विश्वास ठेवतात

जपानच्या विद्यापीठांमध्ये अनेक रायफलरी क्लब आहेत. तिथे जपानी पोलिसही सशस्त्र आहेत. असे असूनही, जपानमधील लोक अजूनही शांततापूर्ण जीवन जगण्यावर विश्वास ठेवतात. जगातील विविध देशांपेक्षा जपान अधिक शांतताप्रिय देश आहे. आकडेवारीनुसार,12.58 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या जपानमध्ये गेल्या वर्षी बंदूकांशी संबंधित फक्त 10 गुन्हेगारी प्रकरणे होती. या घटनांमध्ये एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

तसेच, या वर्षात म्हणजेच 2022 मध्ये राजधानी टोकियोमध्ये (Tokyo) बंदूकीशी संबंधित घटना, जखमी किंवा मृत्यूची कोणतीही घटना घडली नाही. या शहरातून 61 बंदूका जप्त करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे मात्र असे असले तरी, देशातील सर्वात मोठ्या नेत्याची बंदूकीने हत्या करण्यात आल्याने संपूर्ण जपान हादरले आहे. माजी पंतप्रधानांच्या हत्येनंतर आता देशातील मंत्र्यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT