कोरोनाव्हायरसचा नवीन प्रकार Dainik Gomantak
ग्लोबल

Omicron च्या दहशतीमुळे जपानचा मोठा निर्णय! परदेशी प्रवाशांना प्रवेशावर बंदी

अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनचे प्रकार आधीच सापडले आहेत. त्यामुळे, सीमा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक परिणामांना सामोरे जावे लागत आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोनाव्हायरसचा (Corona) नवीन प्रकार, ओमिक्रॉनचा(Omicron) धोका पाहून जपानने जगभरातील सर्व परदेशी प्रवाशांच्या (foreign travelers) प्रवेशावर येण्यास बंदी घेतली आहे. देशाचे पंतप्रधान (PM) फुमियो किशिदा यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, याची अहंमलबजावणी देशात मंगळवारपासून लागू होईल. या घोषणेमुळे असे दिसून येते की, जपान आपल्या सीमेपलीकडील लोकांच्या हालचालींवर नियंत्रण करत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अल्पकालीन व्यावसायिक प्रवासी, परदेशी विद्यार्थी आणि कामगारांसाठी वरती लक्ष असेल.

तसेच, पुढील आठवड्याच्या शेवटी दक्षिण आफ्रिका आणि इतर आठ देशांमधून येणाऱ्या लोकांच्या प्रवेशावर निर्बंध कडक केले आहेत, ज्या अंतर्गत या देशांतील प्रवाशांना सरकारी चिन्हांकित केंद्रांमध्ये 10 दिवसासाठी विलगीकरण करण्यात आले होते. ओमिक्रॉनचा धोका पहाता अनेक देशांनी सीमेवर (border) निर्बंध कडक केले आहेत.

यामध्ये ब्रिटनकडून संशयित ओमिक्रॉन प्रकरणांच्या संपर्कात असलेल्या लोकांना लसीकरण केले गेले असले तरीही त्यांना 10 दिवसांसाठी स्वत: ला विलगीकरण केले पाहिजे. शिवाय बांगलादेश, श्रीलंका, ब्रिटन आणि अमेरिका या देशांनी सुद्धा प्रवासावर बंदी करण्यास सुरुवात केली आहे.

जगभरात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढली!

इस्रायलने परदेशी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घेतली आहे. तसेच मोरोक्कोमध्ये सोमवारपासून देशातील (Country) सर्व उड्डाणे दोन आठवड्यांसाठी स्थगित केली आहेत. हाँगकाँगपासून युरोपपर्यंत आणि युरोपपासून उत्तर अमेरिकेपर्यंत अनेक ठिकाणच्या शास्त्रज्ञांनी या प्रकाराच्या उपस्थितीची माहिती दिली आहे. नेदरलँड्समध्ये रविवारी 13 ओमिक्रॉन रुग्ण सापडले आहेत. कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये दोन प्रकरणे नोंदवली गेली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सीमा खुल्या ठेवण्याचे आवाहन केले. तसेच अनेक देशांमध्ये त्याचे प्रकार आधीच सापडले आहेत. त्यामुळे, सीमा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक परिणामांना सामोरे जावे लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT