Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Viral Video Cobra Bhaji Samosa Snacks: तुम्ही आजवर चिकन, मटन आणि मासे खाणारे अनेक खवय्ये पाहिले असतील, पण कोणी चक्क विषारी कोब्रापासून बनवलेले पदार्थ आवडीने खाताना पाहिले आहे का?

Manish Jadhav

Cobra Meat Street Food Indonesia: तुम्ही आजवर चिकन, मटन आणि मासे खाणारे अनेक खवय्ये पाहिले असतील, पण कोणी चक्क विषारी कोब्रापासून बनवलेले पदार्थ आवडीने खाताना पाहिले आहे का? सध्या सोशल मीडियावर असाच एक अंगावर काटा आणणारा आणि थक्क करणारा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक चिकन-मटन बाजूला ठेवून कोब्रा सापाचे भजी आणि समोसे अगदी ताव मारुन खाताना दिसत आहेत. या अनोख्या व्हिडिओची सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरु आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इंडोनेशियाची (Indonesia) राजधानी जकार्ता येथील एका प्रसिद्ध आणि वेगळ्या स्ट्रीट फूड मार्केटमधील आहे. आपल्याकडे ज्याप्रमाणे प्रत्येक चौकात आणि गल्लीबोळात चाट-समोसे किंवा चिकन-मटनचे स्टॉल्स पाहायला मिळतात, अगदी त्याचप्रमाणे जकार्ताच्या रस्त्यांवर कोब्राच्या मांसापासून बनवलेले विविध पदार्थ विकणारी दुकाने सजलेली असतात. इन्स्टाग्रामवर एका ट्रॅव्हल ब्लॉगरने हा व्हिडिओ शेअर केला असून, तो पाहून नेटीझन्सच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, सापाचे पदार्थ खाण्यासाठी दुकानांवर ग्राहकांची प्रचंड गर्दी होते. या दुकानांमध्ये शेकडो जिवंत कोब्रा साप पिंजऱ्यात ठेवलेले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून या अत्यंत धोकादायक आणि विषारी सापांच्या तोंडावर पट्टी लावलेली आहे, जेणेकरुन ते कोणाला चावणार नाहीत. ग्राहक जशी ऑर्डर देतात, तशा दुकानातील महिला कर्मचारी अत्यंत वेगाने आणि सराईतपणे कोब्रा सापाचे मांस शिजवतात.

दुकानदारांच्या मते, स्थानिक लोकांमध्ये कोब्राच्या मांसाला प्रचंड मागणी आहे. येथे केवळ सापाचे भजीच मिळतात असे नाही, तर कोब्रा सूप, टिक्का, सॉसेज आणि समोसे यांसारखे अनेक चमचमीत पदार्थ ग्राहकांसाठी तयार केले जातात. सापांशी संबंधित हा थरारक व्हिडिओ पाहून जगभरातील नेटीझन्सनी आश्चर्य आणि भीती व्यक्त केली, परंतु जकार्तामधील लोकांसाठी हा त्यांच्या रोजच्या आहाराचा आणि जीवनशैलीचा एक सामान्य भाग बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT