Israeli construction companies have sought permission from the government to recruit 100,000 Indian workers. Dainik Gomantak
ग्लोबल

युद्धाच्या परिस्थितीत इस्रायल भारताकडे मागतोय 1 लाख कामगार, काय आहे Benjamin Netanyahu यांचा प्लॅन?

Ashutosh Masgaunde

Israeli construction companies have sought permission from the government to recruit 100,000 Indian workers:

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. गाझा पट्टीवर इस्रायलकडून बॉम्बफेक करण्यात येत आहे. दरम्यान, इस्रायलने तात्काळ भारताकडे 100,000 कामगारांची मागणी केली आहे.

व्हॉईस ऑफ अमेरिकाच्या वृत्तानुसार, इस्रायली बांधकाम कंपन्यांनी सरकारकडे 100,000 भारतीय कामगारांची भरती करण्याची परवानगी मागितली आहे, जेणेकरून 90 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी कामगारांना बदलता येईल.

7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्यापासून पॅलेस्टिनींचे कामाचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

बांधकाम व्यावसायिकांवर दबाव

पॅलेस्टिनी कामगार इस्रायलमधील बांधकाम कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात. ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर या लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे आता इस्रायलमधील सर्व बांधकामे ठप्प झाली आहेत.

ज्या इमारतींमध्ये काही दिवसांपूर्वी बांधकामे सुरू होती, त्या जागा आता पूर्णपणे रिकामी झाल्या आहेत. ज्या लोकांनी घरे घेतली आहेत ते बांधकाम व्यावसायिकांवर काम सुरू ठेवण्यासाठी दबाव आणत आहेत.

इस्रायली बिल्डर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, 90 हजार पॅलेस्टिनी मजुरांपैकी 10 टक्के गाझा आणि उर्वरित वेस्ट बॅंकमधील आहेत.

1 लाख मजुरांसाठी चर्चा

इस्रायल बिल्डर्स असोसिएशनशी संबंधित लोकांनी सांगितले की, 50 हजारांवरून 1 लाख भारतीय मजुरांना आणण्यासाठी आम्ही सरकारशी चर्चा करत आहोत.

हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये कार्यरत असलेल्या अनेक पॅलेस्टिनींनाही अडचणींचा सामना करावा लागला आहे.

एका पॅलेस्टिनी कामगाराने सांगितले की, 'मी हॉटेलमध्ये चहा पितो, घरी जाऊन जेवण करतो आणि नंतर हॉटेलमध्ये माझ्या मित्रांसोबत राहतो. मला आता काम नाही.'

सध्या इस्रायलमध्ये चालणाऱ्या बहुतांश बांधकाम साईट्स चिनी नागरिकांच्या मालकीच्या आहेत.

भारत-इस्रायल करार

इस्रायलने भारतातून कामगार बोलावण्याचा करार आधीच केला होता. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांनी मे महिन्यात भारताला भेट दिली होती.

त्यानंतर दोन्ही देशांमध्ये एक करार झाला, त्यानुसार 42,000 भारतीय कामगार इस्रायलला जातील, त्यापैकी 34,000 बांधकाम क्षेत्रात काम करतील.

इस्रायलची बांधकाम बाजारपेठ भारतीयांसाठी नवीन असेल. इस्रायलला आधीच पॅलेस्टिनी कामगारांच्या जागी परदेशी कामगार आणायचे होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT