Iran Israel Attack  Dainik Gomantak
ग्लोबल

Iran Israel War: इस्राईलचा हल्लाबोल! 3 कमांडर ठार, आण्विक संशोधन केंद्राला दणका; क्षेपणास्त्रे डागत इराणचे प्रत्युत्तर

Iran Israel Conflict: इराणमधील खोरमाबाद, कोम आणि इस्फहान या शहरांवर देखील इस्राईलकडून क्षेपणास्त्रे डागण्यात आली. इराणनेही प्रत्युत्तर देत तेलअवीव समवेत अन्य शहरांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला.

Sameer Panditrao

तेलअवीव: इस्राईली लष्कराने पुन्हा एकदा इराणच्या वर्मी घाव घालताना त्यांच्या तीन लष्करी कमांडरला ठार मारले. यामध्ये ड्रोन युनिट, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड (आयआरजीसी) कोअर, कुर्द फोर्स आणि पॅलेस्टिनी घडामोडींशी संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

इराणमधील खोरमाबाद, कोम आणि इस्फहान या शहरांवर देखील इस्राईलकडून क्षेपणास्त्रे डागण्यात आली. इराणनेही या हल्ल्याला प्रत्युत्तर देत तेलअवीव समवेत अन्य शहरांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही आताच इस्राईलला हा संघर्ष रोखण्याची सूचना करू शकत नाहीत असे म्हटल्यामुळे तणावामध्ये भर पडली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वप्रकारची चर्चा अन् मध्यस्थी निष्फळ ठरल्यानंतर इस्राईल आणि इराण यांच्यातील संघर्षाने आता दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. युरोपीय देशांचे मंत्री आणि इराणी राजनैतिक अधिकाऱ्यांमध्ये जिनिव्हात शुक्रवारी चर्चा पार पडली खरी पण त्यातून ठोस असे काही हाती लागले नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या संघर्षातील लष्करी हस्तक्षेपाचा पुनरुच्चार करतानाच इराणच्या अणुप्रकल्पांबाबत जाहीर चिंता व्यक्त केली आहे.

‘ऑपरेशन सिंधू’ अंतर्गत युद्धग्रस्त इराणमधून आज २९० भारतीय विशेष विमानाने मायदेशी परतले. इस्राईल इराण संघर्षाची धुमश्चक्री अनुभवलेल्या या भारतीयांनी दिल्ली विमानतळावर उतरताच ‘भारत माता की जय, अशा घोषणा देत आनंद व्यक्त केला आणि सरकारचे आभार मानले.

आज परतलेल्या २९० भारतीय नागरिकांपैकी १९० जण हे जम्मू-काश्मीरमधील होते. तर उर्वरित प्रवाशांमध्ये महाराष्ट्रासह हरियाना, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक राज्यांतील नागरिकांचाही समावेश होता. भारत सरकारने इराण आणि इस्राईलच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधून भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Players Death: क्रीडा विश्वात खळबळ! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू, बोर्डानं घेतला मोठा निर्णय

गुंड जेनिटोची दिवाळी तुरुंगातच; रामा काणकोणकर हल्लाप्रकरणी सर्व संशयितांना 31 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

सीटवरुन झाला वाद, भावांनी ट्रेनमध्ये बॉम्बची अफवा पसरवली; अम्रपाली एक्सप्रेसमध्ये धावपळ, पोलिसांची उडाली तारांबळ

60 कोटींची टांगती तलवार, शिल्पा शेट्टीचं गोव्यात 'होम-हवन'! बास्टियनची पारंपरिक सुरुवात

डिसेंबर 1986, राजभाषा आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले, सासष्टीत जिलेटिन स्‍फोट होत होते, स्‍फोटक वातावरणात 'रवीं'नी मडगाव गाठले

SCROLL FOR NEXT