Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: ''आता ओलीसांना सोडणार नाही...'', इस्रायलच्या हल्ल्याने हमासचा चिडला!

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेला सात दिवसांचा युद्धविराम संपुष्टात आला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा युद्ध सुरु झाले आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेला सात दिवसांचा युद्धविराम संपुष्टात आला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा युद्ध सुरु झाले आहे. इस्रायलने गाझावर वेगाने हल्ले केले आणि हमासची अनेक ठिकाणे उद्ध्वस्त केली. दुसरीकडे, या दोघांमध्ये मध्यस्थी करणाऱ्या देशांचे म्हणणे आहे की, इस्रायलने केलेल्या बॉम्बफेकीमुळे दोघांमधील वैर थांबवणे कठीण झाले आहे. दरम्यान, हमासचा उपप्रमुख सालेह अल-अरौरी याने शनिवारी एका माध्यम संस्थेशी बोलताना सांगितले की, गाझामध्ये युद्धविराम होईपर्यंत इस्रायलसोबत आणखी कैद्यांची देवाणघेवाण केली जाणार नाही.

अरौरीने पुढे सांगितले की, 'हमासने ओलिस ठेवलेले इस्रायली नागरिक हे पूर्वी इस्रायली सैन्यात काम केलेले होते.' जोपर्यंत युद्धविराम होत नाही आणि सर्व पॅलेस्टिनी कैद्यांचीही सुटका होत नाही तोपर्यंत त्यांची सुटका होणार नाही, असे त्याने स्पष्टपणे सांगितले. यासोबतच हा अंतिम निर्णय असून त्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.

इस्रायलने दक्षिण गाझा पट्टीवर बॉम्बहल्ला केला

इस्त्रायली सैन्याने शुक्रवारी दक्षिण गाझा पट्टीवर बॉम्बहल्ला केला, ज्यामुळे खान युनिसच्या सभोवतालच्या भागात ज्वाला उठू लागल्या. सर्वत्र धुराचे ढग दिसत होते. पुन्हा एकदा सर्वत्र विध्वंसाचे दृश्य दिसू लागले. लोकांमध्ये आक्रोश निर्माण झाला. दुसरीकडे, माहिती देताना गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्रायली लष्कराने शुक्रवारी रात्री हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये सुमारे 184 लोकांना आपला जीव गमवावा लागला, तर 589 हून अधिक लोक जखमी झाले, ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्यात अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

युद्धविराम संपल्यानंतर पुन्हा युद्ध सुरु झाले

दरम्यान, युद्ध संपेपर्यंत इस्रायलसोबत कैद्यांची देवाणघेवाण होणार नसल्याचे हमासचे म्हणणे आहे. त्याचवेळी, इस्रायल आणि हमास या दोघांनी युद्धविराम संपुष्टात आल्याबद्दल एकमेकांवर आरोप केले. विशेष म्हणजे, 24 नोव्हेंबरपासून युद्धविराम सुरु झाला होता, त्यानंतर त्याचा कालावधी दोनदा वाढवण्यात आला. दरम्यान, हमासने 110 ओलिसांची सुटका केली होती, त्यापैकी 80 इस्रायली आणि उर्वरित इतर देशांचे नागरिक होते. त्याचवेळी, इस्रायलने 240 पॅलेस्टिनी कैद्यांचीही सुटका केली होती.

हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला

दरम्यान, 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलवर हल्ला केला, ज्यामध्ये 1,200 हून अधिक लोक मारले गेले. या काळात हमासच्या दहशतवाद्यांनी 240 इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले होते. ज्यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. ज्यांना गाझामधील बोगद्याच्या आत ठेवण्यात आले होते.

इस्रायली हल्ल्यात 15 हजार लोकांचा मृत्यू झाला

हमासच्या हल्ल्यापासून इस्रायल गाझामधील हमासच्या लक्ष्यांवर सातत्याने हल्ले करत आहे. गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात आतापर्यंत 15 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासचा खात्मा होईपर्यंत हे युद्ध सुरुच राहील, असे इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू स्पष्टपणे सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT