Hamas Deputy Leader Saleh Al Aroori  Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: हमासचा डेप्यूटी कमांडर ड्रोन हल्ल्यात ठार, लेबनॉनमध्ये घेतले होते शरण; हिजबुल्ला चवताळला!

Israel-Hamas War Latest Update: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरु होऊन जवळपास 3 महिने झाले आहेत.

Manish Jadhav

Israel-Hamas War Latest Update: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरु होऊन जवळपास 3 महिने झाले आहेत. या युद्धात 22 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. दरम्यान, इस्रायली सैन्याने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ला करुन हमासचा डेप्यूटी कमांडर सालेह अल-अरौरी याला ठार केले. इस्रायली लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे. मात्र, इस्रायली लष्कराने याबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही. इस्रायलवरील हल्ल्यांच्या नियोजनात सालेहची महत्त्वाची भूमिका होती. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायली लष्कराने मंगळवारी रात्री गाझामधील हमासच्या कमांड सेंटरवर ताबा मिळवला आहे.

सालेह हा कासम ब्रिगेडचा प्रमुख होता

दरम्यान, या हल्ल्यात सालेह व्यतिरिक्त हमासचे 2 टॉप कमांडर आणि इतर 4 लोक मारले गेले आहेत. सालेह हा हमासची सशस्त्र विंग असलेल्या कासम ब्रिगेडचा प्रमुख होता. तो हमासचा नेता इस्माईल हानीयेह याच्याही जवळचा होता. त्याने लेबनॉनमधील हमास आणि हिजबुल्लाह यांच्यातील दुवा म्हणून काम केले. हल्ल्यानंतर लेबनीज पंतप्रधान म्हणाले की, हा हल्ला लेबनीज सार्वभौमत्वावर आहे. इस्रायलवर आरोप करताना ते म्हणाले की, इस्त्रायलचा या युद्धाशी काहीही संबंध नसतानाही विनाकारण लेबनॉनला या संघर्षात ओढत आहे.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, इस्रायली लष्कराच्या स्पेशल कमांडो युनिटने मंगळवारी एक ऑपरेशन केले, ज्यामध्ये एका इमारतीला घेराव घालून वीज कनेक्शन तोडण्यात आले. यानंतर कमांडो आणि डॉग युनिट आत घुसले. दरम्यान, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. बराच वेळ सुरु असलेल्या गोळीबारात हमासचे अनेक दहशतवादी मारले गेले. दुसरीकडे, सालेहच्या मृत्यूनंतर हिजबुल्ला अस्वस्थ आहे. आपले बोट ट्रिगरवर असून लवकरच सालेहच्या मृत्यूचा बदला घेणार असल्याचे त्यांनी एक निवेदन जारी केले.

22 हजार पॅलेस्टिनी मरण पावले

दरम्यान, युद्ध सुरु होऊन जवळपास 3 महिने उलटले आहेत. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी एक निवेदन जारी करुन सांगितले की, इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 22 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. गेल्या 9 दिवसांत 1 हजाराहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT