Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: इस्रायलचा मोठा निर्णय, गाझामध्ये लढणाऱ्या 5 ब्रिगेड परत बोलावल्या; 24 तासांत 150 पॅलेस्टिनींचा मृत्यू

Israel-Hamas War: इस्रायल आणि पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमास यांच्यात गेल्या तीन महिन्यांपासून युद्ध सुरु आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमास यांच्यात गेल्या तीन महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. हमासने गाझाला आपला तळ बनवला आहे, जिथे मोठी लोकसंख्या राहते. इस्रायली लष्करही गाझामध्ये घुसले असून हमासच्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांना ठार मारत आहे. यातच आता, नवीन वर्षाच्या दिवशी इस्रायलने गाझामधून आपल्या 5 ब्रिगेड्स मागे घेण्याचा आणि हमासचा नायनाट करण्याचा मास्टर प्लॅन बनवला आहे.

दरम्यान, इस्रायली लष्कराने (IDF) युद्धाच्या मध्यातच आपल्या 5 लढाऊ ब्रिगेड्स मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पाच ब्रिगेड हमासशी दोन होत करत आहेत. दुसरीकडे, इस्रायलचा सैनिकांना माघे घेण्याचा उद्देश त्यांना काही दिवस विश्रांती देण्याचा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयडीएफचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी सांगितले की, नवीन वर्षात, काही सैनिक त्यांच्या कुटुंबाकडे परत येतील, जेणेकरुन ते पुढे लढा सुरु ठेवण्यासाठी स्वत: ला मजबूत करु शकतील. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर हे सैनिक पुन्हा लढण्यासाठी गाझामध्ये जातील.

गाझामध्ये गेल्या 24 तासांत 150 लोकांचा मृत्यू झाला

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या युद्धात दोन्ही देशातील लोक मारले जात आहेत. आता इस्रायली सैन्य गाझामध्ये घुसून नरसंहार करत आहे, तर हमासचे दहशतवादी लोकांमध्ये लपून आपला जीव वाचवत आहेत. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने एक आकडेवारी जाहीर केली की, गेल्या 24 तासांत 150 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे, तर 286 लोक गंभीर जखमी आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हमासविरुद्ध युद्ध सुरुच राहील: नेतन्याहू

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासविरुद्ध युद्ध सुरु ठेवण्याची घोषणा केली आहे. जोपर्यंत हमासने ओलीस ठेवलेल्या आमच्या लोकांची सुटका होत नाही तोपर्यंत युद्ध असेच सुरु राहील, असे ते म्हणाले. इस्रायली लष्कर गाझामध्ये घुसून हमास आणि त्याच्या दहशतवाद्यांचे बोगदे उद्ध्वस्त करत आहे, तर हमासही इस्रायलवर हल्ले करत आहे, मात्र या युद्धात नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT