Israel PM Benjamin Netanyahu Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: 80 दिवसापेक्षा जास्त दिवसांच्या युद्धात इस्रायल अपयशी? मूलभूत उद्दिष्टासाठी धडपड सुरुच!

Israel-Hamas War: खान युनिस या दक्षिणेकडील शहरातील एल अमल सिटी हॉस्पिटलजवळ जोरदार बॉम्बहल्ला केला असून त्यात 10 जण ठार आणि 12 जखमी झाले आहेत.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल-हमास युद्धाचा आज 83 वा दिवस आहे. दरम्यान, इस्रायली सुरक्षा दलांनी गाझा पट्टीतील खान युनिस या दक्षिणेकडील शहरातील एल अमल सिटी हॉस्पिटलजवळ बॉम्बहल्ला केला असून त्यात 10 जण ठार आणि 12 जखमी झाले आहेत. इस्त्रायली सैन्याने व्यापलेल्या वेस्ट बँकमधील रामल्ला आणि इतर शहरांवरही हल्ले सुरु केले आहेत. सुमारे तीन महिन्यांच्या प्रदीर्घ युद्धात 20 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत, परंतु इस्रायलला आतापर्यंत आपले दोन मूळ उद्दिष्ट साध्य करण्यात अपयश आले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ऑक्टोबर 2015 मध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सुरु झालेल्या युद्धात दोन मोठे ठराव जाहीर केले होते. पहिला, हमासचा नाश आणि दुसरा, इस्रायली ओलीसांची सुरक्षित सुटका. या दोन्ही आघाड्यांवर इस्रायल आतापर्यंत अपयशी ठरला आहे.

हमासचा अजूनही नायनाट नाही

दरम्यान, गाझामध्ये सुरु असलेल्या युद्धात, इस्रायलला 'हमासचा नायनाट करण्याच्या' त्याच्या प्राथमिक लष्करी उद्दिष्टात लक्षणीय प्रगती साधता आलेली नाही. 80 पेक्षा जास्त दिवस उलटून गेले तरी हमास इस्रायली हल्ल्याला प्रत्युत्तर देत आहे. तो अजूनही इस्रायलवर रॉकेट हल्ला करत आहे. गाझामध्ये इस्रायली सुरक्षा दलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे.

दुसरीकडे, इस्रायलला अजूनही हमासने ओलीस ठेवलेल्या सर्व नागरिकांची सुटका करता आलेली नाही. आतापर्यंत केवळ अर्ध्या ओलिसांची सुटका करण्यात आली आहे. हा आकडा 120 च्या जवळ आहे, तर सुमारे 240 लोकांना हमासने ओलीस ठेवले होते. पंतप्रधान नेतन्याहू या मूळ उद्देशातही अपयशी ठरले आहेत. याचे परिणामही त्यांना भोगावे लागत आहेत. इस्रायली नागरिक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी इस्रायली सरकारवर दबाव आणत आहेत आणि तीन महिन्यात म्हणावे तसे यश न मिळल्याने नेतान्याहू सरकारवर टीका करत आहेत. इस्रायलच्या लष्करी मोहिमेचे चांगले परिणाम अजून समोर यायचे असले तरी युद्धात इस्रायल निर्णायकपणे हरत आहे यात शंका नाही.

पश्चिम युरोपमध्ये इस्रायलचा विरोध वाढत आहे

म्हणजेच युद्धाच्या आघाडीशिवाय, इस्रायलबाबातची आता संपूर्ण जगाची सहानुभूती कमी होत आहे आणि 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर जे देश त्याच्या पाठीशी उभे होते, त्या देशांमध्येही त्याचा जनसंपर्क कमकुवत होत आहे. 'मिडल ईस्ट आय'च्या अहवालानुसार, पश्चिम युरोपमध्ये घेण्यात आलेल्या जनमत चाचण्यांमधून असे दिसून आले आहे की, आता केवळ 35 टक्के जर्मन लोक त्यांच्या सरकारच्या इस्रायल समर्थक भूमिकेचे समर्थन करतात. स्पेनमधील लोक आता इस्रायलपेक्षा पॅलेस्टाईनचे अधिक समर्थन करत आहेत आणि आयरिश लोकांपैकी बहुसंख्य लोक गाझामधील इस्रायलच्या लष्करी मोहिमेला विरोध करतात.

अमेरिकन आणि ब्रिटिश नागरिकही विभागले गेले

हमासच्या विरोधात इस्रायलला पाठिंबा देण्याच्या ब्रिटिश सरकारच्या निर्णयाच्या मुद्द्यावरुन आता ब्रिटिश नागरिकांमध्येही फूट पडली आहे. आता पूर्वीपेक्षा अधिक ब्रिटिश नागरिक पॅलेस्टाईनच्या बाजूने झुकले आहेत. युनायटेड स्टेट्स मध्ये आयोजित सर्वेक्षण डेटा देखील एक समान कहाणी सांगतो. नुकत्याच झालेल्या हार्वर्ड-हॅरिसच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, 18 ते 24 वयोगटातील अमेरिकन लोक हमासला पाठिंबा देणारे आणि इस्रायलला पाठिंबा देणारे यांच्यात समान रीतीने विभागलेले आहेत. अमेरिकेतील 18 ते 24 वर्षे वयोगटातील सुमारे 60 टक्के तरुणांना हमासचा इस्रायलवर 7 ऑक्टोबरला झालेला हल्ला योग्यच होता, असे या सर्वेक्षण अहवालातून समोर आले आहे. 25 ते 34 वयोगटातील जवळपास निम्म्या लोकांना आणि 35 ते 44 वयोगटातील 40 टक्के लोकांना असेच वाटू लागले आहे. त्याचप्रमाणे, पाश्चिमात्य देशांत, मुख्य प्रवाहातील माध्यमे, ज्यांनी युद्ध सुरु झाले तेव्हा इस्रायलला जबरदस्त पाठिंबा दिला होता, आता त्यांची भूमिका बदलू लागली आहे.

सोशल मीडियावरही इस्रायलवर टीका झाली

पाश्चिमात्य देशातील लाखो लोक आता यूट्यूब, टिक-टॉक, इन्स्टाग्राम आणि एक्स सारख्या सोशल मीडियावर इस्रायलच्या विरोधात आवाज उठवत आहेत. या प्लॅटफॉर्मवरील सोशल मीडिया वापरकर्ते ग्राफिक तपशीलांसह गाझा आणि वेस्ट बँक येथे इस्रायलच्या लष्करी मोहिमेमध्ये निष्पाप नागरिकांच्या मृत्यूची प्रकरणे हायलाइट करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 06 July 2025: नवे काम सुरू कराल, प्रेमसंबंध मजबूत होतील; खर्च मात्र जपून करा

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

SCROLL FOR NEXT